आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : हेल्मेट न वापरणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना ‘कार्यालय बंदी’, जनजागृती अभियान उपायुक्तांचे अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
जळगाव - महापालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दुचाकीसाठी हेल्मेटची तर चारचाकी चालवणाऱ्यांसाठी सीट बेल्टची सक्ती करण्यात अाली अाहे. ज्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालवताना हेल्मेट परिधान केलेले नसेल अशा कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात येणार अाहे. या संदर्भातील अादेश नुकतेच जारी करण्यात अाले अाहेत. 
 
माेटार वाहन कायद्यांतर्गत रस्ता वाहतुकीदरम्यान जिवीत हानी टाळण्यासाठी दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट सक्ती चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट सक्ती केली अाहे. या अनुषंगाने जळगाव पाेलिस दलाच्या-वतीने जनजागृती केली जात अाहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व रस्ते महामार्गांवर हेल्मेट सीटबेल्ट वापराबाबत नियम पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत अाहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही या विषयी सक्ती करण्याबाबत सुचना केल्या अाहेत. 
 
तपासणी करणार काेण? 
यासंदर्भात उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी १४ जुलै राेजी सर्व विभाग प्रमुखांना अादेश दिले अाहेत. यात पालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट परिधान केलेले नसल्यास तसेच चारचाकी वाहन चालवताना सिटबेल्टचा वापर करत नसल्यास अशा कर्मचाऱ्यांना अापल्या कार्यालयात प्रवेश देण्यात येवू नये, असे अादेशात म्हटले अाहे. परंतु, या अादेशाची अंमलबजावणी करताना कर्मचाऱ्यांची तपासणी करणार काेण? असा प्रश्न उपस्थित हाेतो. 
 
८०% कर्मचाऱ्यांकडे आहेत वाहने 
पालिकेच्या सतरा मजली इमारतीत नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ८० टक्के कर्मचाऱ्यांकडे दुचाकी असून काही मोजकेच कर्मचारी चारचाकी वाहनांचा वापर करतात. दरम्यान, सात किलोमीटरच्या परिघात असलेल्या कर्मचाऱ्यांकडून शहरातल्या शहरात येण्यासाठी हेल्मेटचा वापर करण्याबाबत आश्चर्य व्यक्त हाेत अाहे. महामार्गावर हेल्मेट सक्ती केल्यास अंमलबजावणी शक्य अाहे. परंतु, शहरात हा नियम लावण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त हाेत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...