आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: आयआरसीटीसीचा पुढाकार; रेल्वेस्थानकावर 8 रुपयांत मिळेल 1 लिटर शुद्ध, थंड पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्र.३ वर बसवलेले ‘वाॅटर व्हेंंडिंग मशीन’. - Divya Marathi
रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्र.३ वर बसवलेले ‘वाॅटर व्हेंंडिंग मशीन’.
जळगाव - रेल्वेस्थानकावर प्रवासादरम्यान शुद्ध थंड पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. ही प्रमुख समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागातील जळगाव रेल्वेस्थानकावर सहा ‘वाॅटर व्हेंंडिंग मशीन’ बसविण्यात येणार अाहे. त्या पैकी सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३वर दाेन ‘वाॅटर व्हेंंडिंग मशीन’ बसविण्याचे काम सुरू झाले असून प्रवाशांना अाता रुपयांत एक लिटर शुद्ध, थंड बाटली बंद पाणी मिळेल, तसेच प्रवाशांनी रिकामी बाटली अाणल्यास ती त्यांना रुपयांत भरून मिळणार अाहे. ही सुविधा २४ तास सुरू राहणार अाहे. 
 
भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव रेल्वेस्थानक हे जंक्शनचे ठिकाण अाहे. जळगावपासून प्रसिद्ध अजिंठा लेणी जवळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची देखील माेठ्या प्रमाणात ये-जा असते. मुंबई सुरत जाण्यासाठी दाेन मार्ग येथूनच जातात. रेल्वेस्थानकावर दररोज अप डाऊन मार्गावर सुमारे ५७ प्रवासी गाड्या थांबतात. त्यातून सुमारे ते हजार प्रवासी दरराेज स्थानकावर चढ-उतार करतात. त्यांना पिण्याचे शुद्ध थंड पाणी अल्पदरात मिळावे, यासाठी
आयआरसीटीसीच्या पुढाकाराने जळगाव रेल्वेस्थानकावर सहा ‘वाॅटर व्हेंंडिंग मशीन’बसविण्यात येणार अाहेत. यातील दाेन युनिट चार दिवसांपूर्वी दाखल झाल्या असून त्या बसविण्याचे काम सध्या सुरू अाहे. प्लॅटफॉर्म क्रमांक वर पहिले युनिट मुंबईकडे जाणाऱ्या भागाकडे, तर दुसरे युनिट हे प्लॅटफॉर्म क्रमांक वर अारएमएस पाेस्ट कार्यालयाजवळ बसविण्यात येणार अाहे. यानंतर १५ दिवसांत उर्वरित चार युनिटचे काम हाती घेण्यात येणार अाहे. या युनिटमुळे प्रवाशांना अल्पदरात २४ तास थंड शुद्ध पाणी उपलब्ध हाेणार अाहे. 

स्टेजमधून शुद्धीकरण 
आयआरसीटीसीच्या माध्यमातून उभारण्यात अालेल्या ‘वाॅटर व्हेंंडिंग मशीन’ला रेल्वे विभागाकडून पाणीपुरवठा हाेणार अाहे. हे पाणी स्टेजमधून शुद्ध केल्यानंतर ते ‘वाॅटर व्हेंंडिंग मशीन’च्या टाकीत येईल. त्यानंतर थंड करून ते प्रवाशांना वितरित केले जाणार अाहे. 
 
दर असे 
सीलबंद बाटली : ३००मिली लिटरसाठी रुपये, ५०० मिली लिटरसाठी रुपये, लिटरसाठी रुपये, लिटरसाठी १२ रुपये, लिटरसाठी २५ रुपये. 
 
रिकामी बाटली भरुन देण्यास : ३००मिली लिटरसाठी रुपया, ५०० मिली लिटरसाठी रुपये, लिटरसाठी रुपये, लिटरसाठी रुपये, लिटरसाठी २० रुपये. 

तीन कर्मचारी नियुक्त ... प्रवाशांनापाणी वितरित करण्यासाठी आयआरसीटीसीने तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली अाहे. तीन शिफ्टमध्ये हे तीन कर्मचारी २४ तास सेवा बजावणार अाहेत. प्रवासी गाडी अाल्यानंतर गर्दी हाेऊन गाेंधळ हाेऊ नये यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार अाहे. 

- २४ ताससुविधा सेवा उपलब्ध. 
- ०३ शिफ्टमध्येकर्मचाऱ्यांचे काम. 
- ०२ नंबरफलाटवर युनिट. 
- १५ दिवसांतचार युनिट बसविणार 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...