आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आचारसंहिता शिथिल हाेताच मनपाने केला शहरात रस्ते दुुरुस्तीचा श्रीगणेशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात साडेतेरा कोटींची कामे मंजूर असताना केवळ आचारसंहितेमुळे ठप्प पडलेल्या प्रशासकीय कामांना बुधवारपासून गती अाली. शहरातील प्रभाग समितीमधील रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली असून अन्य कामांसाठी निविदा मागवण्यात अाल्या अाहेत. विशेष म्हणजे प्रभाग समितीसाठी असलेली ३० लाखांची मर्यादा कमी असल्याने त्यात आणखी वाढ करण्याच्या हालचालींना वेग अाला अाहे. यामुळे येत्या महिनाभरात रस्त्यांवरील खड्डे कमी हाेतील अशी अपेक्षा अाहे.
जळगावकरांसमाेर सगळ्यात माेठी समस्या कोणती, तर प्रत्येकाच्या ताेंडी रस्त्यावरील खड्डे हेच उत्तर येत अाहे. गल्ली-बाेळातील रस्ते तर साेडाच ज्या रस्त्यावरून दररोज हजाराे वाहनांची ये-जा असते असे रस्तेही अाता चांगले राहिलेले नाहीत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने महिनाभरापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण करून दाेन प्रभाग समितीतील कामांसाठी कार्यादेश दिले हाेते. परंतु विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्याने कामांना सुरुवात हाेऊ शकली नव्हती. या ठप्प पडलेल्या कामांना आचारसंहिता शिथिल हाेताच सुरुवात झाली अाहे. मनपा फंडातून करण्यात येणाऱ्या प्रभाग समिती मधील रस्त्यांवरील खड्डे डांबराने बुजवण्याचे काम सुरू झाले. बुधवारी मेहरूण, सिंधी कॉलनी, लाठी शाळेकडील परिसरात रस्त्यांची दुरुस्ती करण्यात अाल्याचे सहायक अभियंता सुनील भाेळे यांनी सांगितले.

पुन्हा मागवल्या निविदा
दाेन वेळा निविदा मागवूनही प्रतिसाद मिळालेल्या प्रभाग समिती मधील रस्त्यांच्या कामांचा प्रश्न गंभीर हाेत चालला अाहे. आचारसंहिता शिथिल हाेताच पालिकेच्या बांधकाम विभागाने या दोन्ही प्रभाग समितीतील रस्त्यांच्या कामासाठी जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागवल्या अाहेत. त्यामुळे या प्रमुख भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त हाेत अाहे.

दोन दिवसात सभेचे नियोजन
रस्ते दुरुस्तीसाठी महासभेने प्रत्येक प्रभाग समितीसाठी ३० लाख रुपये खर्चाची मर्यादा ठरवून दिली अाहे. रस्ते दुरुस्तीसाठी ही मर्यादा अत्यंत कमी असल्याने त्यात अाणखी वाढ करण्याचा प्रयत्न सुरू अाहे. या संदर्भातही महापालिकेच्या स्थायी समिती अाणि महासभेत निर्णय हाेणार अाहे. येत्या दाेन दिवसांत सभा घेण्याचे नियोजन सदस्याकडून केले जाणार अाहे.

शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामासाठी ८० लाख रुपये मंजूर अाहेत. यातून शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्ती करण्यात येणार अाहेत. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून मक्तेदारदेखील काम करण्याच्या तयारीत अाहे. परंतु कार्यादेश देण्यासाठी विभाग प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या झालेल्या नसल्याने कामे खोळंबली अाहेत. अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवताच दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात हाेऊ शकते.

२९ कामांची फेरनिविदा
जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर वळवलेले नंतर शासनाने परत केलेल्या १० कोटींच्या निधीतून १०० कामे करण्यात येणार अाहेत. परंतु त्यातील २९ कामांसाठी फेरनिविदा मागवण्यात अाली अाहे. त्यानंतर या कामांचेही कार्यादेश महिनाभरात देण्यात येणार अाहेत. त्याचप्रमाणे शासनाने महिनाभरापूर्वी मंजूर केलेल्या २५ कोटींच्या निधीतून काही कामे बदलण्यात येणार असल्याने या कामांना येत्या महासभेत मंजुरी घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार अाहे. त्या दृष्टीनेही अाता अधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली अाहे.
लाठी शाळेजवळ बुधवारी रस्ता दुरुस्तीचे काम करताना महापालिकेचे कर्मचारी.
बातम्या आणखी आहेत...