Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | news about jalgaon zilha parishad meeting

सभापतींएेवजी सभापती ‘पतिराजां’च्या उपस्थितीत घेतली बैठक

प्रतिनिधी | Update - Oct 10, 2017, 09:32 AM IST

जिल्हापरिषद अध्यक्षांच्या दालनात बाेलावलेल्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महिला बालकल्याण समितीच्या सभापती रजनी चव्

 • news about jalgaon zilha parishad meeting
  जळगाव- जिल्हापरिषद अध्यक्षांच्या दालनात बाेलावलेल्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महिला बालकल्याण समितीच्या सभापती रजनी चव्हाण यांच्याएेवजी त्यांचे पती जे. के. चव्हाण यांनी हजेरी लावली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील अाणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्या मधाेमध बसून चव्हाण यांनी अधिकाऱ्यांकडून अाढावा घेतला.

  जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या दालनामध्ये जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती, विभाग प्रमुखांची बैठक साेमवारी अायाेजित करण्यात अाली हाेती. ११ अाॅक्टाेबर राेजी हाेणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या तयारीसाठी अायाेजित केलेल्या अाढावा बैठकीला अध्यक्षा उज्ज्वला पाटील, शिक्षण सभापती पाेपट भाेळे, अाराेग्य सभापती दिलीप पाटील, अतिरिक्त तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्यासह महिला बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण यांचे पती जे. के. चव्हाण उपस्थित हाेते. काेणत्याही पदावर नसलेले सेवानिवृत्त अभियंता असलेले चव्हाण यांनी सभापतींचे अधिकार वापरून सभा चालवली.

  अधिकाऱ्यांकडून पाठराखण
  पदाधिकारीमहिलेएेवजी त्यांच्या पतीने सभापतिपदाचे अधिकार वापरत बैठकीत हजेरी लावल्याचा प्रकार लक्षात अाल्यानंतर जिल्हा परिषदेतील जबाबदार अधिकाऱ्यांनी याला विराेध करणे अपेक्षित हाेते. मात्र, त्यांनी विराेध केला नाही. पतिराजांच्या हस्तक्षेप राेखण्यासाठी अपात्रता किंवा थेट फाैजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद अाहे.

  सर्व साधारण सभेत गाजणार मुद्दा
  जलसंपदामंत्रीगिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्यामुळे चव्हाण यांना विराेध करणे अधिकाऱ्यांना कठीण गेले. अाता हा विषय त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता अाहे. ११ अाॅक्टाेबर राेजी सर्वसाधारण सभा असल्यामुळे जे. के. चव्हाण यांच्या हस्तक्षेपावर विराेधकांकडून टीका हाेण्याची शक्यता अाहे.

  कर्नाटक न्यायालयाची नाराजी
  कर्नाटकातील यादगीर जिल्हा परिषदेत पतीने लाेकप्रतिनिधी पत्नीएेवजी बैठकीस हजेरी लावली हाेती. त्यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली हाेती. त्यावर १० फेब्रुवारी २०१७ राेजी निकाल देताना उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत, हा गंभीर प्रकार असून यापुढे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी असे प्रकार हाेऊ देऊ नये, असे बजावले हाेते.

Trending