आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेत पदांसाठी भाजप सदस्यांचे लाॅबिंग, नेत्यांकडून समान न्याय मिळण्याची अपेक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हापरिषदेत भाजपची सत्ता स्थापन होणार हे निश्चित असल्यामुळे भाजपचे सदस्य अाता सत्तेत पदे मिळण्यासाठी लाॅबिंग करू लागले अाहेत. अापापल्या कार्यक्षेत्रातील पदाधिकारी, अामदार यांच्या मदतीने उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापतिपद पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले अाहेत. जिल्ह्यातील दाेन्ही लाेकसभा मतदारसंघ, तालुके यांना गृहीत धरून न्यायाने पदाचे वाटप हाेण्याची अपेक्षा सदस्यांमधून व्यक्त हाेत अाहे. दरम्यान भाजपने अजून यासंदर्भात सदस्यांना काेणताही निराेप दिलेला नाही. जिल्ह्यात ३३ जागांसह पहिल्या क्रमांकांची पक्ष म्हणून पुढे अालेल्या भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघ्या एका मताची गरज अाहे. 

काँग्रेसकडून एक मत मिळणार असल्याचे गृहीत धरत भाजपचे सदस्य सत्तेत महत्त्वाची पदे मिळावी म्हणून प्रयत्न करीत अाहेत. अध्यक्षपदाचा मान रावेर तालुक्याला मिळण्याची शक्यता असली तरी इतर दावेदारांकडून देखील अध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरू झाले अाहेत. उपाध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापतिपद मिळावे म्हणून नवनिर्वाचित सदस्य जिल्ह्यातील पक्षाचे नेते,अामदार यांच्याशी संपर्क साधून अाहेत. अध्यक्षपद रावेर लाेकसभा मतदारसंघात दिल्यास उपाध्यक्षपद जळगाव लाेकसभा मतदारसंघाला मिळण्याची मागणी हाेत अाहे. 

युती करण्यास सदस्यांचा विरोध 
अवघेएकच मत कमी असल्याने शिवसेनेसाेबत युती करू नये, अशी भाजप सदस्यांची ठाम भूमिका अाहे. एका मतासाठी सेनेला सत्तेत सहभागी करण्यास सदस्यांचा विराेध अाहे. चार सदस्य असलेल्या काँग्रेसचा पाठिंबा घेण्याबाबत भाजपचे नेते प्रयत्नशिल अाहेत. एका मताच्या बदल्यात काँग्रेसच्या सदस्याला एखाद्या विषय समितीचे सभापतिपद देण्याचाही विचार हाेऊ शकताे. 

२० मार्चला अध्यक्ष निवडीची शक्यता 
विद्यमानजिल्हा परिषद अध्यक्षांचा २१ मार्च राेजी कार्यकाळ संपत अाहे. २० मार्च राेजी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांमधून नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड हाेईल. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर हाेणार अाहे. त्यानंतर विविध विषय समित्यांचे सभापती जाहीर हाेतील.
बातम्या आणखी आहेत...