आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या पर्यटकांची धार्मिक स्थळांना भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - धार्मिक पंथाशी जुळलेल्या जपान देशातील महिला पर्यटक त्यांच्यासोबत असलेल्या दोन भारतीय साधकांनी शहरातील धार्मिक स्थळांना शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांच्याकडे खासगी भेटीसाठी हे पर्यटक आले होते. त्यांनी एकवीरादेवी मंदिर स्वामिनारायण मंदिराला भेट देऊन तेथील पुरातनकालीन मंदिर बांधकाम शैलीची माहिती घेतली. 
 
सध्या जपान येथे धार्मिक संप्रदायाशी जुळलेल्या ओकुबो युमिको या भारतभेटीवर आल्या आहेत. यादरम्यान त्यांनी धुळे येथे भेट दिली. आयुक्त संगीता धायगुडे यांच्याकडे त्या खासगी भेटीस आल्या आहेत. त्यांच्यासाेबत या संप्रदायातील भारतीय नागरिक सत्या मेहता निमिष पाटील हेदेखील आहेत. ओकुबो युमिको या मूळ सिंगापूर येथील अाहेत. सध्या त्या जपानमध्ये वास्तव्य करतात. पर्यटनासोबत शहरातील धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ओकुबो युमिको, सत्या मेहता, निमिष पाटील, आयुक्त संगीता धायगुडे, सहायक आयुक्त रवींद्र जाधव, महापालिकेचे कर्मचारी अनिल साळुंुके इतरांनी खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिराला भेट दिली. तसेच दर्शन घेऊन पूजापाठ करणारे गुरव यांच्याशी संवाद साधला. मंदिराबाबतची माहिती जाणून घेतल्यानंतर श्रीमती युमिको या मंदिराबाहेर अाल्या. त्यानंतर दत्त मंदिर परिसरात असलेल्या स्वामिनारायण संप्रदायाच्या मंदिराला त्यांनी भेट दिली. नव्याने बांधकाम होत असलेल्या मंदिराची त्यांनी पाहणी केली. मंदिराचे उंच घुमट, खांब तसेच इतर रचना पाहून त्यांनी अधिक माहिती जाणून घेतल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

शैलीची पाहणी... 
स्वामिनारायण मंदिराचे लाल रंगाच्या दगडात बांधकाम होत आहे. या मंदिराची विशालता व्यापक परिसराचीही त्यांनी अभ्यासात्मक सखोल माहिती घेतली. 
स्वामिनारायण मंिदराच्या बांधकामाची माहिती घेताना पर्यटक. 
बातम्या आणखी आहेत...