आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वेळा देता येईल ‘जेईई मेन’, परीक्षेसाठी अर्जप्रक्रिया सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी आवश्यक असलेली जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई मेन) आता तीन वेळा देता येणार आहे. परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. एप्रिल २०१६ रोजी ऑफलाइन आणि १० एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे.
ऑफलाइन परीक्षेसाठी जनरल अाेबीसी संवर्गासाठी एक हजार रुपये, तर मुली आरक्षित संवर्गासाठी ५०० रुपये फी राहील. परीक्षेसाठी सामान्य ओबीसी संवर्गाच्या मुलांसाठी ५०० तर मुलींसाठी २५० रुपये फी आकारण्यात येणार आहे. तर आरक्षित वर्गासाठी २५० रुपये राहतील. अर्ज करण्यासाठी www.jeemain.nic.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यापूर्वीदाेन वेळा संधी
यापूर्वीजेईई मेन ही परीक्षा विद्यार्थ्यांना दोन वेळा देता येत असे. परंतु २०१६ पासून तीन वेळा परीक्षा देता येण्याची संधी मिळणार आहे. त्या संदर्भातील अधिकृत परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी २०१४ आणि २०१५ चे पेपर्स संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. मेन परीक्षा पास झाल्यानंतर २२ मे रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा होणार आहे. त्याची नोंदणी २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

शहरातीलविद्यार्थी लागले अभ्यासाला
परीक्षेच्यातयारीसाठी शहरातील विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. जेईई परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना देशभरातील कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशाच्या संधी मिळतात. या परीक्षेत चांगलीच स्पर्धा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कस लागतो. यासाठी खासगी क्लासेसचालकांकडून विद्यार्थी तयारी करून घेत आहेत.

असे आहे वेळापत्रक
{३१ डिसेंबर : अर्जाची शेवटची तारीख
- मार्च २०१६ : प्रवेश पत्र मिळणार
- एप्रिल : ऑफलाइन परीक्षा
- १० एप्रिल : ऑनलाइन परीक्षा
- १८ ते २२ एप्रिल : अॅन्सर की जाहीर
- २७ एप्रिल : दोन लाख मुलांचा निकाल
- ३० जूनपर्यंत ऑल इंडिया रँक
शैक्षणिक
बातम्या आणखी आहेत...