आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: जिनिंगला आग; 3 हजार क्विंटल कापूस जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन तासांत आग आटोक्यात... २० मिनिटांनी दोन बंब घटनास्थळी पोहचले. त्या बंबांनी जिनिंगमध्ये असलेल्या बोअरिंगच्या पाण्याने अाग विझवण्यात अाली. आग लागली तेंव्हा जिनिंगमध्ये ५० पेक्षा जास्त कर्मचारी काम करीत होते. महिला कर्मचारी भीतीपोटी कंपनीच्या बाहेर जाऊन उभ्या होत्या. दुपारी वाजता लागलेली ही आग वाजता पूर्णपणे आटोक्यात आली. दरम्यान, २००८ मध्ये देखील या जिनिंगला आग लागली होती. 
 
कर्मचाऱ्याची तत्परता... आव्हानेजवळील लक्ष्मण पाटील यांच्या लक्ष्मी जिनिंग अॅण्ड प्रेसिंगला बुधवारी दुपारी वाजता अचानक आग लागली. यात तीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचा दावा केला आहे. उज्ज्वल सोनवणे या कर्मचाऱ्याला आग दिसल्यानंतर त्याने इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी अाग विझवण्यासाठी धावाधाव केली. तसेच अकाउंटंट इंदर तिवारी यांनी अग्निशामक दलाल फोन करून माहिती दिली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...