आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला मारले जोडे, भाजयुमोतर्फे करण्यात आला तीव्र निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे: छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून दिशाभूल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा भाजयुमोतर्फे निषेध करण्यात आला. महाराणा प्रताप चौकात अाव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात अाले. 
 
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आमदार आव्हाड यांनी शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला तर अफजल खानाचा गौरव करण्याचा प्रयत्न केला. 

या माध्यमातून एकप्रकारे शिवाजी महाराजांचा अवमानच करण्यात आला. याचा निषेध करीत भाजयुमोने आमदार आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. या आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कुणाल चौधरी, सागर कोडगीर, स्वप्निल लोकरे, निनाद पाटील, अॅड.सचिन जाधव, नितीन शिंदे, मनोज पिसे, मयूर मोरे, आकाश अग्रवाल, संकेत पाचपुते, किशोर मुसळे, ऋषीकेश गांगुर्डे, गणेश बडगुजर आदींसह पदाधिकारी सहभागी झाले हाेते. 
भाजयुमोतर्फे अामदार आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारताना पदाधिकारी.