आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या ‘जखमे’वर दानवे, पांडुरंग फुंडकरांची फुंकर! नाथाभाऊंकडून अन्यायाचा पुनरुच्चार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाची अनेकांना उत्सुकता लागून होती. मंत्री असताना खडसेंच्या दारापुढे चपलांचा खच पडत होता. चौकाचौकात बॅनर्स लागत होते. अाता स्थिती काय असेल? त्यांच्या कार्यक्रमांना कोण कोण हजेरी लावतो, याचीही चर्चा होती. शुक्रवारी खडसेंचा वाढदिवस मुक्ताईनगरात साजरा झाला. जळगावचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही आवर्जून उपस्थिती लावली होती. मात्र, एकाच जिल्ह्याचे एकाच पक्षाचे ज्येष्ठ नेते असूनही जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी मात्र कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. अर्थात, त्यांची तोंडे विरुद्ध दिशेलाच असल्यामुळे त्यांनी जाणे अपेक्षितही नव्हते.

रावसाहेब दानवेंचे अापल्यावर पहिल्यापासून प्रेम असल्याचे खडसेंनीही बोलून दाखवले. दानवेंनीही ‘कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, तेच माझ्या मनात आहे,’ असे सांगून खडसेंवर अन्याय झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. नंतर फुंडकरांनीही पक्षवाढीसाठी आणि सरकारमध्ये खडसेंचे काम कसे वाखाणण्याजोगे राहिले आहे, याचेच दाखले दिले. तसे पाहिले तर खडसे मंत्री असताना त्यांनी जळगावातील आपल्या बंगल्यात वाढदिवस साजरा केला होता. मात्र, या वर्षी मुक्ताईनगरातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर सभा, मेळावा आणि रॅलीचे आयोजन केले होते. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही घेतले. या सर्व कार्यक्रमांना त्यांनीही आवर्जून हजेरी लावली.

प्रसार माध्यमांमधूनही खडसेंचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. सर्वच मीडियावर शुभेच्छा जाहिरातीचे फलक झळकले. या वेळचा वाढदिवस म्हणजे खडसेंचे मंत्रिपद गेल्यानंतरचे जणू शक्तिप्रदर्शनच होते. खडसेंवर लागोपाठ झालेल्या तीन वेगवेगळ्या गंभीर आरोपांपैकी दाऊदशी संभाषण आणि गजानन पाटील यांनी कथित लाच मागितल्याच्या प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. पुणे येथील जमीन खरेदी प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी सुरू आहे. चौकशीचे पुढे काय झाले हे जाहीर करण्यास ना सरकार तयार अाहे ना खडसे. आपल्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. तरीही पक्षाने आपल्याला मंत्रिपदावरून काढले हे बोलण्याची संधी मात्र खडसे सोडत नाहीत.
मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर खडसेंचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यामागे मुख्यमंत्र्यांना अापली राजकीय ताकद दाखवून देणे हा एक उद्देश असला तरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा गोतावळा सांभाळणे हेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते.

दानवे आणि खडसे यांची मैत्री आणि प्रेम यापूर्वीही लपून राहिलेली नाही. खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार, अशा ब्रेकिंग न्यूज सुरू असताना दुसरीकडे दानवे मात्र खडसेंवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे ठामपणे सांगत होते. याचाच अर्थ दानवेंना विश्वासात घेता खडसेंवर झालेल्या कारवाईचे त्यांनाही प्रदेशाध्यक्ष म्हणून खदखद असणारच आहे. बहुजन प्रेम आहे ते वेगळेच. त्यामुळे खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले पाहिजे, असे सूतोवाच ते अधूनमधून करीत असतात. फुंडकर हेही खडसेंचे स्नेही आहेत. गिरीश महाजनांचा पत्ता कट करून फुंडकरांना जळगावचे पालकमंत्री करण्यात खडसेंचा मोठा वाटा आहे. फुंडकरांना जळगावात वारंवार यावे लागेल म्हणून त्यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमांना हजेरी लावून खडसेंवर विश्वास व्यक्त केला. ‘खडसे या प्रकरणातून बाहेर पडून पुन्हा मंत्री होतील. खान्देश विकासाचे मोठे काम त्यांच्या हातून झाले आहे,’ असेही ते म्हणाले.
पुढे वाचा, काय म्हणाले खडसे... टार्गेट मुख्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...