आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिटवी येथील महिलेचा खून; आरोपीस जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - पारोळा तालुक्यातील टिटवी येथील महिलेच्या खूनप्रकरणी एकास येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २५ नोव्हेंबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. 
सुमनबाई गुलाब भील ही तिच्या शेतात काम करीत होती. दुपारी वाजेच्या सुमारास सुखराम भील हा हातात खाटीचा लाकडी माचा घेऊन जात असताना त्यास धनराज पाटील यांनी पाहिले. थोड्या वेळात सुमनबाईच्या शेतातून ओरडण्याचा आवाज आला. त्या शेतात धनराज पाटील यांनी जाऊन पाहिले असता, सुखराम भील हा लाकडी माच्याने सुमनबाईला मारत होता. तसेच तिचा गळा दाबत होता. ही घटना बघितल्याचे लक्षात येताच सुखराम नजीकच्या शेतात खाटीचा माचा फेकून घटनास्थळावरून निसटला होता. धनराज पाटील यांनी सरपंच इतर शेतकऱ्यांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी सुमनबाईचे प्रेत ग्रामीण रुग्णालयात नेले. 

आठ साक्षीदार तपासले 
याप्रकरणीधनराज पाटील यांच्या फिर्यादीवरून सुखराम भील याच्याविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खटला अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. याकामी सरकारी वकील किशोर बागुल यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. धनराज पाटील डॉ.सुरेश पाटील यांची साक्ष ग्राह्य धरून न्या.दिनेश कोठलीकर यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा पाच हजार रुपये दंड आणि हा दंड भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. 
बातम्या आणखी आहेत...