आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: नवरात्रीनंतर भारनियमन सुरू; दिवाळीतही राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचे चटके बसू लागले असून, प्रचंड उकाडा जाणवत असतानाच वीज भारनियमनामुळे जळगावकरांचा जीव कासावीस झाला आहे. बुधवारी दिवसभरात पाच तासांपेक्षा अधिक वेळ वीज भारनियमन करण्यात आल्याने नागरिकांच्या जीवाची काहिली झाली. दरम्यान दिवाळीचा सण दहा दिवसावर आला आहे. यामुळे या सणातही भारनियमन होण्याचे संकेत दिले जात आहे. 
 
राज्यात निर्माण झालेल्या वीज तुटवड्यामुळे भारनियमन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या भागात वीज बिल भरण्याचे प्रमाण समाधानकारक आहे, अशा भागातही भारनियमन सुरू झाले आहे. जवळपास महिन्यापासून वेगवेगळ्या भागात कमी-अधिक प्रमाणात वीज भारनियमन सुरू झाले आहे. मध्यंतरास दुर्गोत्सवामुळे भारनियमन काही दिवस खंडित झाले होते. उत्सव संपताच ते पुन्हा सुरू झाले आहे. परिणामी उद्योग, व्यवसायावरही मोठा परिणाम जाणवू लागला आहे. एकीकडे ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढत असतानाच वीज भारनियमनामुळे शहरवासियांची अडचण वाढली आहे. दिवसभर वीज भारनियमन सुरू असल्यामुळे उकाड्याने नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. तसेच भारनियमनामुळे जनरेटर, इन्व्हर्टरचा वापर पुन्हा वाढू लागला आहे. वीजबिल भरणाऱ्यांनाही भारनियमनाचा फटका बसत आहे.
 
दिवाळीमध्ये सुद्धा भारनियमनाचे संकेत 
शहरातीलआशाबाबा, रामानंदनगर, हरिविठ्ठलमध्ये भारनियमन व्यतिरिक्तही वीज बंद राहिल्याने नागरिक उकाड्याने कमालीचे हैराण झाले. त्यामुळे त्यांनी महावितरणावर संताप व्यक्त केला. 
बातम्या आणखी आहेत...