आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद घरातून लांबवला दीड लाखांचा एेवज, रामानंदनगर ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव - महाबळ परिसरातील नागेश्वर काॅलनीतील विश्वदीप अपार्टमेंटजवळील प्लाॅट क्र. मधून चाेरट्यांनी बंद घराचे कुलूप ताेडून दीड किलाे चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा एेवज लंपास केला अाहे. ही घटना ३० जानेवारी रात्री ते ३१ जानेवारी दुपारी वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी बुधवारी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
नागेश्वर काॅलनीतील प्लाॅट क्र. मध्ये सुनील बनवारीलाल प्रजापत हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. दीड महिन्यापासून सुनील प्रजापत हे पुणे येथे अार्किटेक्चरचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले अाहेत. तर त्यांची पत्नी भावना प्रजापत या त्यांच्या माहेरी राजस्थानमधील खंडेला (जि. शिखर) येथे गेलेल्या अाहेत. त्यामुळे रायसाेनीनगरात राहणारा त्यांचा लहान भाऊ नरेंद्र बनवारीलाल प्रजापत (वय २१) दरराेज त्यांच्या घरात झाेपण्यासाठी येत हाेता. 
 
सुनील यांचे घराच्या कंपाउंडमध्ये दीपिका फॅन्सी अाणि जनरल स्टाेअर्स नावाचे दुकान अाहे. दुकानावर त्यांची अाई लक्ष्मीबाई प्रजापत बसतात. त्यांचे वडील बनवारीलाल प्रजापत हे तीन दिवसांपासून गावाला गेलेले हाेते. त्यामुळे दुकान बंद हाेते. ३० जानेवारी राेजी रात्री वाजता नरेंद्र प्रजापत याने त्याची बहिण दीपिकाची बॅग ठेवून ते रायसाेनीनगरातील त्यांच्या घरी जेवणासाठी निघून गेले. 
 
३१ जानेवारी राेजी नरेंद्र भाऊ सुनील यांच्या घरी अाला. त्या वेळी दरवाजाचा काेयंडा तुटलेला दिसला. चाेरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले हाेते. तसेच लाेखंडी कपाटाचा दरवाजा उघडा हाेता. त्यामुळे नरेेंद्र याने त्यांच्या अाईला फाेन करून बाेलावले. याप्रकरणी बुधवारी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
दीड किलाे चांदीच्या दागिन्यांचा समावेश 
चाेरट्यांनी प्रजापत यांच्या घरातील कपाटात ठेवलेेले दीड किलाे चांदीचे दागिने, ताेळे साेन्याचे दागिने, १० हजार रुपयांची चिल्लर अाणि साड्या असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा एेवज लंपास केला. मात्र, एेवजाच्या जुन्या किमती प्रमाणे रामानंदनगर पाेलिस ठाण्यात ४९ हजार रुपयांचा एेवज चाेरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...