आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल शहरात रथोत्सव; सावद्यामध्ये बारागाड्या, अनेक दशकांची पंरपरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वल शहरातील महर्षी व्यास मंदिरासमोरील हडकाई-खडकाई नदीपात्रापासून रथाची मिरवणूक सुरू झाली. त्यात शहरातील तरुणांसह आबाल-वृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. - Divya Marathi
वल शहरातील महर्षी व्यास मंदिरासमोरील हडकाई-खडकाई नदीपात्रापासून रथाची मिरवणूक सुरू झाली. त्यात शहरातील तरुणांसह आबाल-वृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावल- शेकडो वर्षांची पंरपरा असलेला भगवान श्री बालाजी यांचा रथोत्सव मंगळवारी यावल शहरात साजरा झाला. यानिमित्त सायंकाळी महर्षी व्यास मंदिरासमोरील हडकाई- खडकाई नदीपात्रात रथाचे पूजन झाल्यावर शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघाली. या उत्सवाचे औचित्य साधून बडगुजर समाजातर्फे चोपडा रोडवर श्री खंडोबाची यात्रा बारागाड्यादेखील ओढण्यात आल्या.
 
रथोत्सवानिमित्त हडकाई नदीपात्रात यात्रा भरते. एकीकडे पूजन झाल्यावर महर्षी व्यास मंदिरासमोरील नदीपात्रातून रथ नगरपालिकामार्गे डांगपुरा मशिदजवळ दाखल होतो. तर दुसरीकडे चोपडा रस्त्यावर खंडोबाच्या मंदिरात यात्रात्सव भरतो. येथे महापुजा झाल्यावर चोपडा रस्त्यावरील विज उपकेंद्रापासून ते नदीच्या शहराकडील मार्गादरम्यान बारागाड्या ओढण्यात आल्या. बडगुजर समाजातर्फे हा उत्सव झाला. बारागाड्या ओढल्यानंतर रथ पुढे चावडी, मेनरोड, बोरावल गेट, देशमुखवाडा, लक्ष्मीनारायण मंदिरमार्गे, रेणुकादेवीच्या मंदिराजवळ बुधवारी पहाटे पोहोचेल. 
 
असा आहे इतिहास : माजीनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांचे आजोबा (कै.) पांडुरंग धोंडू देशमुख आणि सहकाऱ्यांनी सन १९१४ मध्ये रथोत्सव सुरू केला होता. रामजी मिस्त्री यांनी हा रथ विनामूल्य तयार करून दिला होता. पुजारी म्हणून वासुदेवबाबा बियाणी, राजाभाऊ नागराज, भय्याजी अग्नीहोत्री, नंतर १९७३ ते २००६ या काळात रमेशशास्त्री बियाणी, नारायणराव बियाणी, बलवंत जोशी २००६नंतर आजतागायत महेश बियाणी, राजू बियाणी सुनील जोशी पुजारी म्हणून काम पाहतात. 
 
सावद्यात मिरवणूक 
सावद्यात सकाळी मोठा मारुती, लहान मारुती, क्रांती चौक हनुमान मंदिर, स्वामिनारायणनगरातील हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा झाला. जय बजरंग प्रतिष्ठानतर्फे सायंकाळी शहरातून बजरंगबलीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी सायंकाळीच मरिमातेच्या यात्रेनिमित्त बारागाड्या ओढण्यात आल्या. 
 
भाविकांनी ओढला रथ 
सुमारे१२ टन वजनाचा रथ भाविकांनी स्वत: ओढला. अतिशय शिताफीने रथाच्या चाकांना मोगरी लावण्याचे कसब कौतुकास्पद ठरले. या रथासोबतच भालदार-चोपदार मंडळीदेखील होती. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी रथाचे पूजन स्वागत झाले. दरम्यान, रथोत्सव आणि बारागाड्यांचा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा बारागाड्या आणि रथोत्सवाचे फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...