आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान महावीरांचा जयघोष करून दिला बेटी, पाणी वाचवण्याचा संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालगंधर्व नाट्यगृह येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महाेत्सवात बाेलताना अशाेक जैन. व्यासपीठावर सुरेश जैन, डॉ. बिपीन दाेशी, अार. सी. बाफना, ईश्वरलाल जैन, दलीचंद जैन आदी. - Divya Marathi
बालगंधर्व नाट्यगृह येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महाेत्सवात बाेलताना अशाेक जैन. व्यासपीठावर सुरेश जैन, डॉ. बिपीन दाेशी, अार. सी. बाफना, ईश्वरलाल जैन, दलीचंद जैन आदी.
जळगाव- शहरातील सर्व जैन समाजांतर्फे भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महाेत्सव रविवारी उत्साहात साजरा करण्यात अाला. यानिमित्ताने शाेभायात्रा मार्गांवर अाकर्षक कमानी उभारून भगवान महावीरांचा जयघोष करीत घराघरांतून मिरवणुकीचे स्वागत करण्यात अाले. शाेभायात्रेतील ‘बेटी बचाअाे-बेटी पढाअाे’, ‘जल है ताे कल है’ या सामाजिक संदेशांसह भगवान महावीर यांच्या जीवनातील प्रसंग त्यांच्या सिद्धांतांच्या चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेत तब्बल हजार समाजबांधव सहभागी झाले हाेते. 
 
वासुपूज्य मंदिरात ध्वजवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मिरवणूक काढून सकल जैन संघातर्फे बालगंधर्व नाट्यगृहात भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महाेत्सवाचा मुख्य कार्यक्रम झाला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात अाले. माजी मंत्री सुरेश जैन अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार ईश्वरलाल जैन, शाकाहार- सदाचाराचे प्रणेते रतनलाल बाफना, जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सकल जैन श्री संघ श्री.वर्धमान स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष दलिचंद जैन, श्री.जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष सुगनचंद राका, श्री.जैन श्वेतांबर तेरापंथ सभेचे अध्यक्ष मनोज सुराणा, श्री.महावीर दिगंबर जैन चैत्यालय ट्रस्टचे अध्यक्ष राजेश जैन, गौतम प्रसादीचे लाभार्थी कनकमल राका उपस्थित होते. या वेळी सर्वांचे जीवन सुखी कसे हाेईल, हेच भगवान महावीर स्वामींनी शिकविले. क्रोध, मन, माया, लोभ या चार गोष्टींची सुखी जीवनात बाधा येते, त्यांचा त्याग करीत भगवान महावीरांचे चार भाव अंगीकारले तर मानवी जीवन सुखी होईल, असा विश्वास जैन स्कॉलर युनिव्हर्सिटी आॅफ मुंबईचे प्रा. डॉ. बिपिन दोशी यांनी व्यक्त केला. अपूर्वा राका नितीन चाेपडा यांनी सूत्रसंचालन केले. 
 
शाॅर्टसर्किटमुळे काही वेळ उडाला गाेंधळ 
गाैतम प्रसादीप्रसंगी शाॅर्टसर्किटमुळे जेवणाच्या मंडपास किरकोळ प्रमाणात अाग लागली. यामुळे मात्र उपस्थितांमध्ये गाेंधळ उडाला; परंतु सतर्कतेमुळे लगेचच पाणी टाकून आग विझवण्यात आली. मंडपात पंख्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे शाॅर्टसर्किट होऊन मंडप काही प्रमाणात जळाला. मंडपाचा जळालेला भाग लगेच काढून टाकण्यात अाला. 
 
अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी जनजागृती 
महाप्रसादात समाजातील प्रत्येकाने सहभाग नाेंदवला. अार.अार.शाळेत गाैतम प्रसादीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यामध्ये अन्नाची नासाडी काेणीही करू नये यासाठी अायाेजकांतर्फे वारंवार सूचना करण्यात अाल्या. तसेच लागेल तेवढेच अन्न घ्या; अन्न वाया जाऊ देऊ नका, असे प्रत्येकाला सांगण्यात अाले. त्यामुळे काेणीही अन्न ताटात टाकले नाही. यामुळे महाप्रसादाच्यावेळी कोठेही अन्नाची नासाडी झाल्याचे दिसून आले नाही. 
 
घर, कार्यालय सजावट स्पर्धा 
शाेभायात्रा मार्गांत घर कार्यालय सजावट स्पर्धा झाली. या अागळ्यावेगळ्या स्पर्धेचे यंदा प्रथमच अायाेजन करण्यात अाले हाेते. यामध्ये अनेकांनी सहभाग नाेंदवला. याप्रसंगी काेणी जैन धर्मातील तत्त्वांची माहिती देणारी सजावट, तर काेणी भगवान महावीर यांच्या स्वागतासाठी घराला पूर्ण सुशाेभित केले हाेते. घराच्या अासपासच्या परिसरातही फुले, ताेरण, रांगाेळी याद्वारे सजावट करून मिरवणुकीचे स्वागत केले.
 
शांती, बंधुत्वाचा संदेश 
ध्वजवंदनानंतर वरघाेडा मिरवणूक ही वासुपूज्य मंदिरापासून टाॅवर चाैक, सुभाष चाैक, सराफ बाजार, रथ चाैक, सागरभवन, चित्रा चाैकमार्गे बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत काढण्यात अाली. यामध्ये ध्वज हातात धरत घाेडेस्वार मुले हाेती. वाजंत्री पथकासह सजीव अारास, जनजागृतीपर देखावे, भगवान महावीर यांचा रथ, पेशवाई वाजंत्री पथक, धारावली गाडी, भगवान महावीर यांचा चांदीच्या रथाचा समावेश हाेता. महिलांनी लाल चुनरी रंगाची साडी, तर पुरुषांनी श्वेत वस्त्र परिधान करीत समाजाला शांती, बंधुता यांचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांचे नामस्मरण केले. या शाेभायात्रेचे प्रकल्पप्रमुख रिंकेश गांधी हाेते. 
 
०५ ट्रॅक्टरद्वारे सहा चित्ररथांचा समावेश 
११५ रक्तदात्यांनी केले रक्तदान 
३० कुटुंबेगृह सजावट स्पर्धेत सहभागी 
५०० किलाे बुंदीच्या लाडूंचे वाटप 
०३ हजार समाज बांधवांचा सहभाग 
 
रक्तदान शिबिर 
या वेळी जैन समाजातर्फे रक्तदान शिबिरही घेण्यात अाले. यात ११५ जणांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांनीदेखील या उपक्रमास भेट दिली. यासाठी इंडियन रेडक्राॅस अाणि गाेळवलकर रक्तपेढी यांचे सहकार्य मिळाले. 
बातम्या आणखी आहेत...