आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षाच्या पहिल्या दिवशी रस्त्यावर पडलेले मृतदेह पाहून नागरिक सुन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत-नागपूर महामार्गावर बाळापूर शिवारात झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी झालेली नागरिकांची गर्दी. - Divya Marathi
सुरत-नागपूर महामार्गावर बाळापूर शिवारात झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी झालेली नागरिकांची गर्दी.
धुळे- शहरानजीक बाळापूर शिवारातील शासकीय गोदामासमोर रविवारी सकाळी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाले. या अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूला सुमारे दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर पडलेल्या दोन युवकांचे मृतदेह गंभीर जखमी झालेल्या अन्य एका युवकाला पाहून या ठिकाणाहून येणाऱ्या-जाणाऱ्यांचा थरकाप उडत हाेता. हा अपघात पाहून प्रत्येक जण सुन्न झाला होता. मृत झालेले दोन्ही युवक धुळे तालुक्यातील बाळापूर येथील होते. घटनेनंतर गावावर शोककळा पसरली. 
 
नागपूर-सुरत महामार्गावरील बाळापूर शिवारातील शासकीय गाेदामासमाेर धुळ्याकडे येणाऱ्या माेटारसायकलला इंडिका कारने धडक दिली. या अपघातात बाळापूर येथील नकुल विनायक मिस्तरी (१८), हर्षल उर्फ सनी संजय पाटील (२१) हे ठार तर समित शिरीष वाघ जखमी झाला. गावातील दोन मित्र नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अपघातात मृत्युमुखी पडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. बाळापूर गावात दरवर्षी डिसेंबर महिन्यात काही तरी वाईट घटना घडते. यंदा चार ते पाच वर्षांनंतर डिसेंबर महिन्यात एकही वाईट घटना घडली नव्हती. त्यामुळे बाळापूरकरांनी काल शनिवारी मध्यरात्री नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले; परंतु नवीन वर्षाच्या स्वागताच्या आनंदावर रविवारी सकाळी झालेल्या अपघाताच्या घटनेने विरजण पडले. अपघातानंतर जखमी झालेल्या समित वाघनेच गावात माेबाइलद्वारे अपघाताची माहिती दिली. त्यानंतर गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर नकुल, हर्षल, समित तिन्ही रक्त्याच्या थारोळ्यात महामार्गावर पडले होते. त्यामुळे काेणाचीही जवळ जाण्याची हिंमत हाेत नव्हती. या वेळी काहींनी काही वाहनचालकांना जखमींना रुग्णालयात पाेहाेचवण्याची विनंती केली. मात्र, काेणीही तयार झाले नाही. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. अपघाताची माहिती मिळाल्यावर तालुका पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक घुमावत, काॅन्स्टेबल चाैधरी घटनास्थळी गेले. त्यांनी रुग्णवाहिका मागवत मृतदेह रुग्णालयात पाठवले. तसेच अपघातग्रस्त वाहन बाजूला करीत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. ताेपर्यंत महामार्गावर दाेन्ही बाजूला वाहनांच्या दाेन किलाेमीटर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली हाेती. या वेळी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची चांगलीच कसरत झाली. सकाळी अकरा वाजेनंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. अपघातानंतर घटनास्थळी माजी अामदार शरद पाटील, भारतीय जनता पक्षाचे किशाेर सिंघवी यांनी भेट दिली. 

दोन्ही सर्वसामान्य कुटुंबातील 
अपघातातमृत्युमुखी पडलेल्या दोन्ही तरुणांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. हातमजुरीवरच दाेघांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. हर्षल नकुल हे दाेघे शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेत हाेते. हर्षलचे वडील  रीक्षा चालवतात. त्यांना हातभार लावण्यासाठी हर्षल काम करत होता. त्याला एक भाऊ असून, त्याच्या पश्चात अाजी, अाजाेबा अाई-वडील असा परिवार आहे. नकुल मिस्तरी याचे वडीलही मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्याच्या माेठ्या बहिणीचा विवाह झाला असून, एक बहीण लहान अाहे. त्याच्या पश्चात अाई, वडील, अाजी, अाजाेबा, तीन काका, काकू, इतर भावंडे असा परिवार आहे. नकुलही काम करून शिक्षण घेत होता. अपघातामुळे पाटील, मिस्तरी परिवारावर माेठा अाघात झाला अाहे. नुकल हा एकुलता एक होता. 

अपघाताची अाठवण 
चारिदवसांपूर्वीच मूूंंबई-अाग्रा महामार्गावर अार्वी येथे बसचा तिहेरी अपघात झाला. तसेच सप्टेंबर महिन्यात फागणे येथे काळीपिवळी प्रवासी वाहनाला अपघात हाेऊन १७ जणांचा मृत्यू झाला. त्यात बाळापूर येथील दाेन युवक एका महिलेचा समावेश हाेता. या अपघाताची अाठवण बाळापूरकरांना या घटनेनंतर झाली. गावातील अनेक तरुणांचा महामार्गावरील अपघातात मृत्यू झालेला अाहे. त्यामुळे महामार्गाच्या चाैपदरीकरणासह दुरुस्तीचे काम तातडीने करावे, अशी मागणी केली जात अाहे. 

पाेलिसआले उशिरा 
सकाळीसाडेनऊ वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर पाेलिस अर्धातास उशिरा घटनास्थळी अाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यापूर्वीही महामार्गावर झालेल्या अपघाताच्या वेळी पाेलिस घटनास्थळी उशिरा आले होते. त्यामुळे पाेलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. अपघातानंतर काही जणांनी रास्ता राेेकाे आंदोलन करण्याची तयारी केली हाेती. मात्र काही नागरिकांनी समजावले. 
 
सीसीटीव्ही फुटेजमधून कारचा शाेध 
अपघातापासून दाेनशे ते तीनशे मीटरवर नाल्याकाठी सूर्यवंशी टाइल्स नावाचे दुकान अाहे. या ठिकाणी सुरक्षेसाठी प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला अाहे. कॅमेऱ्याची दिशा महामार्गाकडे असल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे शूटिंग हाेते. त्यामुळे पाेलिस युवकांना धडक देणाऱ्या कारची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणार आहेत. त्यातून धडक देऊन पसार झालेल्या कारचा शोध घेतला जाणार आहे.
 
अपघातात दाेघांचा मृत्यू झाल्याची बातमी गावात पाेहाेचताच पाटील, मिस्तरी कुटुंबाने एकच आक्रोश केला. कुटुंबातील सदस्यांचा अाक्राेश पाहून अनेकांचे डाेळे पाणावले. शवविच्छेदनानंतर दुपारी चार वाजेनंतर दाेघांचा मृतदेह ताब्यात मिळाल्यावर सायंकाळी गावात एकाच वेळी दाेघांवर शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात अाले. या वेळी गावातील नागरिक उपस्थित हाेते. 
बातम्या आणखी आहेत...