आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: शिव मंदिर सजले, महाशिवरात्रीनिमित्त आज दिवसभर कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाशिवरात्री निमित्त शहरातील महादेव मंदिरात पूजेची जय्यत तयारी करण्यात अाली अाहे. गुरुवारीच अाेंकारेश्वर मंदिरासह शिवधाम मंदिर अन्य शिवालयांची रंगरंगाेटी सजावट करण्यात अाली हाेती. विद्युत राेषणाईमुळे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला शिवालये उजळून निघाली अाहेत. सकाळपासून भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करण्यात अाली अाहे. 
अाेंकारेश्वर मंदिरात शुक्रवारी यात्रोत्सवाचे अायाेजन केले अाहे. दर्शनासाठी मंदिर पहाटे वाजता उघडण्यात येणार अाहे. २४ तासांत विशेष पर्वात अभिषेक पूजेसह महाअारतीचा कार्यक्रम हाेणार अाहे. श्रीकृष्ण काॅलनीतील बजरंग बाेगद्याजवळील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्री महाकालेश्वर दर्शन अारास करणार असल्याचे श्री सिद्धेश्वर महादेव संस्थेने कळ‌वले अाहे. तसेच तालुक्यातील धानाेरा बुद्रूक येथील नागाई जाेगाई मंदिर येथेही शिवलिंगाची पूजा हाेणार अाहे. 

शिवधाम मंदिरावर केलेली रोषणाई 
‘एक शाम शिवजी के नाम’ कार्यक्रम 

‘भाेले अाे भाेले...’, ‘अाेम नम: शिवाय’चा गजर करीत ‘एक शाम शिवजी के नाम’ या कार्यक्रमात विविध गीतांद्वारे शंकराची आराधना करण्यात अाली. गीतझंकार ग्रुपतर्फे बालगंधर्व नाट्यगृहात गुरुवारी हा कार्यक्रम झाला. रजनीकांत काेठारी, दीपक जाेशी, विजयकुमार काेसाेदे, माेहन तायडे यांच्या हस्ते उद््घाटन झाले. शरद भालेराव, सुनील चाैधरी, राजू जंजाळे, संगीता सामुद्रे, अरुण नेवे, जगदीश चांगरे यांनी गीते गायली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...