आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन हजारांवर महिलांच्या नावे शेती,जिल्हा प्रशासनाने दिले मोफत सातबारा उतारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महिला सबलीकरणाचा लाभ आता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू लागला आहे. ग्रामस्थही सजग झाले आहेत. सत्तेची धुरा त्यांच्या हाती देण्याबरोबर संपत्तीची जबाबदारीही सोपवली जात आहे. जळगाव तालुक्यात तब्बल तीन हजारावर महिलांच्या नावावर शेती करण्याचे पुरोगामी पाऊल ग्रामीण कुटुंबांनी टाकले आहे. या महिला शेतकऱ्यांना नुकतेच तालुका प्रशासनातर्फे मोफत सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले.

जिल्हा प्रशासनातर्फे महसूल सप्ताह राबवण्यात आला. त्यानिमित्त प्रशासनाने महिला खातेदार शेतकऱ्यांना मोफत सातबारा उतारा वाटप करण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र महिला खातेदार शेतकऱ्यांची यादी उपलब्ध नव्हती. त्यामुळे महसूल प्रशासनाला महिला खातेदारांचा शोध घ्यावा लागला. तलाठ्यांनी काढलेल्या माहितीनुसार तीन हजार महिला खातेदार जळगाव तालुक्यात आढळून आल्या.
त्यापैकी हजार ९७ महिला शेतकऱ्यांना माेफत सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. यावरून महिला सबलीकरण सक्षमीकरणाचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना मिळू लागला आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांचे सक्षमीकरण झाले आहे. हुंड्यासाठी छळ, माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ आदी दुर्घटनांबरोबर ग्रामीण भागात सकारात्मक दृष्टिकोनही वृध्दींगत होत आहे. महिला सबलीकरण सक्षमीकरणाचा लाभ आता खेड्यापाड्यापर्यंत पाझरू लागला आहे.

११५३महिला कुटुंब प्रमुख
जुन्यानागरी संस्कृतीमध्ये देशात मातृसत्ताक पद्धत होती. ती हळुहळू पितृसत्ताक झाली. त्यात ज्येष्ठ व्यक्ती कुटुंब प्रमुख बनला. त्यानंतर स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळू लागली होती. कालांतराने परिवर्तनास सुरुवात झाली. तसेच शासनातर्फे महसूल सप्ताहांतर्गत महिला सबलीकरणाचे उपक्रम राबवण्यात आले. शिधा पत्रिकेवर कुटुंबप्रमुख म्हणून ११५३ महिलांची नोंदणी करण्यात आली. ५०६ महिलांना सामाजिक अर्थसहाय योजनेचा लाभ देण्यात आला. तालुक्यातील १८९ महिलांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

हे खरे महिला सक्षमीकरण
महाराजस्व अभियानांतर्गत महिला खातेदार शेतकऱ्यांना मोफत सातबारा उताऱ्यांचे वाटप करावयाचे होते. यासाठी आम्ही जळगाव तालुक्यातील महिला खातेदारांचा शोध घेतला असता तब्बल तीन हजारावर महिलांच्या नावावर शेती करण्याचा पुरोगामी निर्णय घेतल्याचे आढळून आले. हे खरे महिला सबलीकरण सक्षमीकरण आहे. त्यापैकी हजार ९७ महिला खातेदार शेतकऱ्यांना मोफत सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. अमोलनिकम, तहसीलदार जळगाव तालुका
बातम्या आणखी आहेत...