आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा युवक फसला पोलिसांच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला मुंबईहून पळवून नेणाऱ्या युवकाला भुसावळ जीआरपीने रविवारी रात्री ८.४५ वाजता शिताफीने ताब्यात घेतले. रेल्वे स्थानकावर अवघ्या १० मिनिटात संपूर्ण रेल्वेगाडीची तपासणी करून पोलिसांनी दोघांना गाडीतून खाली उतरवले.  मुंबईतील अल्पवयीन मुलीला एक युवक कुर्ला-गोरखपूर एक्स्प्रेसने पळवून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 
 
मुंबई नियंत्रण कक्षाने ही माहिती नागपूर लाेहमार्ग पाेलिस अधीक्षक साहेबराव पाटील यांना रात्री ८.३० वाजता कळवली. त्यानंतर ही गाडी अवघ्या १० मिनिटात भुसावळ स्थानकावर येणार असल्याने अधीक्षक पाटील यांनी तातडीने भुसावळ जीअारपी निरीक्षक डी.बी.सरक यांना माहिती दिली.
 
 त्यानुसार गाडी भुसावळ जंक्शन स्थानकावर येताच पोलिस निरीक्षक सरक, सहायक पाेलिस निरीक्षक उज्वल पाटील, उपनिरीक्षक शब्बीर शेख, उपनिरीक्षक त्र्यंबक वाघ,उपनिरीक्षक संजय साळुंखे सहायक फाैजदार भरत शिरसाठ यांच्यासह महिला पाेलिस निता तडवी, अलका मांढाळे यांनी सहकाऱ्यांसह गाडीची तपासणी केली.
 
 उपनिरीक्षक शब्बीर शेख अारपीएफ जवान शेख महेमूद जनरल डबा तपासत असताना त्यांना सीट नंबर ३५ वर एक मुलगी आढळली. चौकशी केली असता ती अडखळली. तसेच समोर बसलेल्या युवकालादेखील नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी दोघांना गाडीतून खाली उतरवले. मुंबईतून पळालेले दोघे हेच असल्याची ओळख पटवण्यात आली. अाझाद अहेमद शाहीद अली गाेढीया (रा. उत्तर प्रदेश) या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 
 
कौतुकास्पद कामगिरी 
-भुसावळ लोहमार्ग पाेलिसांनी केलेले काम खरेच काैतुकास्पद आहे. गाडीत सापडलेली मुलगी युवकाला मुंबई पाेलिसांच्या स्वाधीन केले जाईल. साहेबरावपाटील, पाेलिस अधीक्षक, जीअारपी, नागपूर 
बातम्या आणखी आहेत...