आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे : विवाहितेच्या अंगावर राॅकेल टाकून ढकलले पेटत्या गॅसवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
धुळे - काैटुंबिक वादातून विवाहितेला मारहाण करण्यात अाली. याच वादातून विवाहितेच्या अंगावर राॅकेल टाकून तिला पेटत्या गॅसवर ढकलून देत जाळून मारण्याचा प्रयत्न माेहाडी उपनगरातील दंडेवाला बाबा नगरात घडला. याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध पाेिलसांत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला अाहे. विवाहितेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर हिरे मेडिकल काॅलेज येथे उपचार केले जात अाहेत. 
 
माेहाडी उपनगरातील दंडेवाला बाबा नगरात अनिता ईश्वर सूर्यवंशी (वय २५) ही पती ईश्वर शंकर सूर्यवंशी यांच्यासाेबत राहते. तिचे सासर शहरातील शर्मा नगरात अाहे. अनिता अाणि पती ईश्वर यांचे िकरकाेळ कारणावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. अनिता ही सासर असलेल्या शर्मानगर येथे दि.२१ मे राेजी सायंकाळी वाजता अाली. त्या वेळी सासरी तिला सासरा शंकर दगा सूर्यवंशी, सासू सुशीला शंकर सूर्यवंशी, नणंद याेगिता ज्याेती (पूर्ण नाव नाही) अाणि दीर सागर सूर्यवंशी यांनी घरगुती किरकाेळ कारणावरून मारहाण केली. त्यामुळे अनिता तिचा पती ईश्वर हे त्यांचे दंडेवालेबाबा नगरातील घरी परतले. याच कारणावरून काल मंगळवारी रात्री वाजता पुन्हा अनिता पतीमध्ये वाद हाेऊन भांडण झाले. या वेळी ईश्वरने बरेवाईट बाेलून अनिताच्या अंगावर राॅकेल टाकून तिला पेटत्या गॅसवर ढकलून दिले. त्यात अनिता जळाली. तिला उपचारासाठी हिरे मेडिकल काॅलेज रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...