आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खर्चाला दिला फाटा: 44 जाेडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा, खाटिक समाजाचा आदर्श

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेले वर आणि वऱ्हाडी. - Divya Marathi
सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेले वर आणि वऱ्हाडी.
भुसावळ - वाढती महागाई अाणि विवाहावर हाेणारा अवाढव्य खर्च टाळण्यासाठी मंगळवारी भुसावळ शहर तालुका खान्देश मुस्लिम खाटिक बिरादरीतर्फे सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. खडका रोडवरील नवीन इदगाहजवळ झालेल्या या सोहळ्यात ४४ जाेडप्यांचा विवाह झाला. मध्यप्रदेश, महाराष्ट्र गुजरात राज्यातील वधू-वरांनी विवाह सोहळ्यात सहभाग नोंदवला. 
खाटिक समाजातर्फे प्रथमच सामूहिक शहरात सामूहिक विवाह सोहळ्याचे अायाेजन झाले.
 
खडकाराेडवरील नवीन इदगाहजवळ झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मंगळवारी पहाटे वाजेपासूनच वधू-वरांसह त्यांच्या नातेवाईकांनी विवाहस्थळी गर्दी केली. सकाळी ते ८.३० या वेळेत अालेल्या सर्वच पाहुण्यांना फराळ देण्यात अाला. विवाहाला मध्यप्रदेश, गुजरात अाणि महाराष्ट्रातून माेठ्या प्रमाणावर वर-वधू आले हाेते. केवळ पाहुण्यांना बसण्यासाठी ३०० मंडपांची स्वतंत्र व्यवस्था होती. आलेल्या वऱ्हाडींच्या स्वागतासाठी आयोजकांनी चोख नियोजन केले होते. भाेपाळ, पुणे, सूरत, खंडवा, हरदा, जळगाव, दाेंडाईचा,
यावल, मालेगाव, नेपानगर अादी ठिकाणाहून समाजबांधव सहभागी झाले. 
 
१२ हजार वऱ्हाडींचा सहभाग 
विवाहसोहळ्यासाठी मैदानावर जवळपास १०० मंडप टाकण्यात अाले हाेते. प्रत्येक वधू-वरांसाेबत जळपास ५० ते १०० वऱ्हाडी मंडळी हाेती. अशाप्रकारे सुमारे १० ते १२ हजार वऱ्हाडींनी हजेरी लावली.दुपारपर्यंत सर्व पाहुण्या मंडळींचे जेवण अाटाेपले होते. नियोजनामुळे कुठेही गोंधळ झाला नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...