आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: कर्तृत्व अाणि नम्रतेचा मेळ म्हणजे भाऊ : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अापल्या कर्तृत्वामुळे भव्य व्यक्तिमत्त्व ठरलेल्या संबंध जगात स्थान मिळालेल्या भवरलाल जैन यांनी व्यवसाय वाढवताना सामाजिक बांधिलकी जाेपासली. ड्रिपच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांती अाणत शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी अाणली. हे सर्व काही कर्तृत्व अाणि नम्रतेमुळे शक्य झाले असून या दोन्ही गुणांचा मेळ म्हणजे भाऊ असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

काव्यरत्नावली चाैकात जैन उद्याेग समूहाच्या माध्यमातून ७० दिवसांत उभारलेल्या पद्मश्री भवरलाल जैन थीम पार्क अर्थात ‘भाऊंचे उद्यान’ याचा लाेकार्पण साेहळा शनिवारी सायंकाळी शेकडाे जळगावकरांच्या उपस्थित पार पडला. भवरलाल जैन यांच्या प्रथम स्मृतिदिनी जळगावकरांसाठी भव्य उद्यान खुले करण्यात अाले. या वेळी अायाेजित कार्यक्रमाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पद्मश्री सुशील मुन्शी, माजी मंत्री एकनाथ खडसे, सुरेश जैन, महापाैर नितीन लढ्ढा, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अामदार चंदुलाल पटेल, सुरेश भाेळे, किशाेर पाटील, खासदार ए. टी. पाटील, रक्षा खडसे, रमेश जैन, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासह लाेकप्रतिनिधी अधिकारी उपस्थित हाेते. अतुल जैन यांनी प्रास्ताविक केले. 

बांधिलकी जाेपासणे गरजेचे 
पालकमंत्रीपाटील यांनी जुन्या अाठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, १९८०च्या काळात गरीब मुलांना पुस्तक घेणे शक्य नसल्याने पुस्तक पेढीची कल्पना भाऊंसमोर मांडली. ती कल्पना अावडल्याने त्यांनी अनेक वर्षे हा उपक्रम राबवला. दरम्यानच्या काळात भवरलाल जैन यांच्या जीवनातील अनेक पैलू पाहिले. माणसं कर्तृत्व गाजवतात, पैसे कमवतात; परंतु त्यांच्यात कर्तृत्व अाणि नम्रता याचे काँबिनेशन कमी हाेत चालले अाहे. हेच काँबिनेशन भवरलाल भाऊ यांच्यात हाेते. व्यवसाय करताना त्यांनी शेतकऱ्यांचे दु:ख अाेळखले, त्यांना काय हवे, त्यांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले. अागामी काळात समाजात सरकारने काम करणे कठीण हाेत अाहे. एकीकडे कर वाढवायचे नाही आणि दुसरीकडे विकासही व्हायला हवा. सरकार अापल्या पद्धतीने प्रयत्न करत अाहे. परंतु जैन उद्याेग समूहाप्रमाणे प्रत्येकाने अापली भूमिका अाेळखणे गरजेचे अाहे. ज्यांना शक्य अाहे. त्यांनी गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन सहभाग नाेंदवण्याची गरज पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच उद्यान रविवारी सायंकाळी वाजेनंतर खुले राहील. 
 
विकासाची कामे व्हावीत 
उद्यानाच्यामाध्यमातून चांगली उपलब्धी असल्याचे सांगत शहरात ठिकठिकाणी उद्याने निर्मितीची जबाबदारी जैन उद्याेग समूहाने घेतल्याचे माजी मंत्री खडसेंनी सांगितले. महापालिकेला उद्यानांची देखभाल दुरुस्ती करणे शक्य हाेत नाही. परंतु, कंपन्यांनी व्यवस्था दिल्यास ते शक्य हाेणार अाहे. शासकीय जागा विकास कामांसाठी हस्तांतरित करण्याचे शासन परिपत्रक माझ्याच काळात काढले. त्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी चांगला उपयाेग केल्याचे तसेच शहरात अन्य ठिकाणी उद्याने उभारण्याची गरज व्यक्त केली. महापाैर लढ्ढा यांनीही शहराच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर सहकार राज्यमंत्री पाटील यांनी जैन उद्याेग समूहाकडे मागणी करताच बांभाेरी गावासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून फिल्टर बसवून दिल्याची अाठवण करून दिली. 

१५० खेडी परिपूर्ण करणार 
उत्पन्नातीलजेवढा लागेल तेवढा पैसा ठेवून उर्वरित समाजासाठी देणे गरजेचे असल्याचे भाऊ म्हणत होते. त्यांच्या या सूचनेचे पालन पुढच्या सर्व पिढींकडून केले जाईल, अशी ग्वाही जैन उद्याेग समूहाचे अध्यक्ष अशाेक जैन यांनी दिली. केवळ जळगाव मनात ठेवता काम करताेय. जळगाव जिल्ह्याचा अामचा अाहे. जिथे शक्य तिथे सीएसअारच्या माध्यमातून कंपनी चांगले काम करण्याचा प्रयत्न करतेय. वर्षांत गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून १५० खेड्यांची निवड करण्यात येणार अाहे. यातील ९० टक्के खेडी जळगाव जिल्ह्यातील असणार अाहेत. त्या खेड्यांचा कायापालट करणार असून संपूर्ण १५० खेडी परिपूर्ण करण्याचा मानस अध्यक्ष जैन यांनी व्यक्त केला. 

शहराचा चेहरामाेहरा बदलू 
भवरलालजैन यांनी वाकाेदपासून सुरू केलेल्या व्यवसायाचा विस्तार जगभरात झाला अाहे. सामाजिक, शैक्षणिक अाराेग्य क्षेत्रात भरीव काम केले. अनेक श्रीमंत धनाढ्य लाेकं अाहेत; पण देण्याची दानत लागते. मतदार संघातील नागरिकांना माेतीबिंदूचे अाॅपरेशन करण्यासाठी मुंबईला घेऊन जात असताना भवरलाल जैन यांनी येण्या-जाण्याचा संपूर्ण खर्च केल्याची अाठवण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी करून दिली. गेल्या काही वर्षांत महापालिका अडचणीत अाली. जळगाव जिल्ह्याचे ठिकाण अाहे. जिल्ह्याने अाम्हाला माेठे केले अाहे. त्यामुळे शहर सुंदर करण्यासाठी शासन पातळीवर हवी ती मदत करण्याचे अाश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. संपूर्ण शहराचा चेहरामाेहरा बदलण्यासाठी सहकार्य करणार असल्याची घाेषणा केली. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील. 
सर्वच मान्यवरांनी अापल्या भाषणात राजकीय पक्षांचे विचार बाजूला करून पक्ष विरहित काम करण्याची भावना व्यक्त केली. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्याच्या राजकारणातील कट्टर शत्रू अशी अाेळख असलेले एकनाथ खडसे सुरेश जैन हे बऱ्याच वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दाेन खुर्च्या साेडून बसल्याचे पाहायला मिळाले. 
बातम्या आणखी आहेत...