जळगाव - राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी कोथळीतील शेतामध्ये ८१६० चौरस मीटर क्षेत्रावर हरितगृहात गुलाब शेती फुलविली आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत २९ लाख ३० हजार ९१८ रुपयांचे अनुदान मिळविले आहे.
अभियानांतर्गत शेतकऱ्यांना हरितगृहासाठी किमान १ ते ४ हजार चौरस मीटर क्षेत्रासाठी अर्थसाहाय्य मिळते. प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान कमाल क्षेत्र मर्यादा ४ हजार चौरस मीटरसाठी प्रति लाभार्थी देण्यात येते. एकनाथ खडसे यांनी ४०८० चौरस व मंदाकिनी खडसे यांनी ४०८० चौरस क्षेत्रावर हरितगृहामध्ये गुलाबाची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांना पन्नास टक्के अनुदान वितरित करण्यात आले आहे. कृषीमंत्र्यांच्या एकमेव मुक्ताईनगर तालुक्यात आठ जणांना हरितगृहासाठी अनुदान देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना मिळाले हरितगृहासाठी अनुदान
एकनाथ खडसे व मंदाकीनी खडसे, कोथळी, ता.मुक्ताईनगर
वासुदेव कमलाकर बढे, रूईखेडे, ता.मुक्ताईनगर
ज्योती चंद्रशेखर बढे, पिंप्री अकाऊत, ता.मुक्ताईनगर
ईश्वरलाल चिंधू पाटील, दापोरी,ता.एरंडोल,
विद्या शरद येवले, कडगाव, ता.जळगाव
प्रमिला आत्माराम शिरसाठ, गारखेडे, ता.धरणगाव
भागवत मंगु वंजारी, अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर
बाबुलाल ज्योतीराम पाटील, फरकांडे, ता.एरंडोल
महेश साहेबराव पाटील, वाघोदे, ता.अमळनेर
अशोक मोरेश्वर बोराखडे, मुक्ताईनगर
अरूण कडू रायपूरे, रूईखेडा, ता.मुक्ताईनगर
स्मिता रत्नेश पलोड, पाळधी, ता.धरणगाव
सोहनसिंग विजय ठाकूर, पिंप्रासीकम, ता.भुसावळ
पुंडलीक दौलत भडांगे, पाळधी, ता.जामनेर
भुपेश लोटू पाटील, कुसुंबा, ता.जळगाव
लिलाधर गोपाळ पाटील, खडकी, ता.भुसावळ.