आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेत सर्वसामान्यांना न्याय मिळताे, म्हणून झालाे मंत्री: राज्यमंत्री गुलाबराव पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाराेळा- शिवसेनेत सर्वसामान्यांना न्याय मिळताे. रंजलेल्या-गांजलेल्यांच्या सेवेसाठी सर्वप्रथम शिवसैनिकच धावून जाताे. मंत्रिपदाची जी जबाबदारी पक्षाने खांद्यावर टाकली, ती नि:स्वार्थ भावनेने पेलताेय. स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना निवडून दिले तर खऱ्या अर्थाने पथदर्शी विकास हाेईल, असे मत शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. 

माजी आमदार चिमणराव पाटील, बाजार समिती सभापती अमोल पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष चतुर पाटील, जानकीराम पाटील, पोपट नाईक, जिजाबराव पाटील, मंगरूळ-शिरसमणी गटाचे उमेदवार डॉ. हर्षल माने, प्रमोद जाधव, पूजा पाटील, एकनाथ पाटील विचारमंचावर उपस्थित होते. चतुर पाटील डॉ. हर्षल माने यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र साेडले, तर बाजार समितीत माजी पालकमंत्री, माजी खासदार यांनी अापल्या कुटुंबातील सदस्यांना संचालकपद दिले. 

अाताही दाेघांची धडपड अापल्या मुलांना उमेदवारी देऊन सत्ताकेंद्र घरातच ठेवण्यासाठी सुरू अाहे. मतदारसंघात मेहू-टेहू, चबुतरे, पळासखेडे या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना राष्ट्रवादीची नेतेमंडळी न्याय देऊ शकली नाही, अशी टीका माजी अामदार चिमणराव पाटील यांनी केली. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला स्थानिक पातळीवर अाघाडी करावी लागते, ही शाेकांतिका अाहे. जिल्ह्यात हा पक्ष संपल्यात जमा अाहे, असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी या सभेत घेतला. नाेटबंदीच्या निर्णयामुळे सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला. गेल्या ६० वर्षांत ज्यांनी नागरी सुविधा दिल्या नाहीत, अशा कांॅग्रेसच्या मागे राष्ट्रवादीला अस्तित्व शाेधण्यासाठी जावे लागत अाहे, अशी काेपरखळी त्यांनी मारली. सभेचे सूत्रसंचालन प्रा.आर.बी.पाटील यांनी केले. तर आभार विश्वास पाटील यांनी मानले. 

माजी मंत्री खडसे, आमदार जावळेंसाठी विजय महत्त्वाचा 
रावेर- राजकीयदृष्ट्या विचार करता रावेर तालुक्याची रावेर आणि मुक्ताईनगर अशा दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघात विभागणी झालेली आहे. रावेरातील ४२ गावांचा मुक्ताईनगरात समावेश असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यादृष्टीने या तालुक्यात भाजपचा विजय प्रतिष्ठेची बाब आहे. शिवाय मुक्ताईनगरला जोडलेली ४२ गावे वगळता उर्वरित गावे आणि यावल तालुक्यातील तीन महसूल सर्कलचा समावेश असलेल्या रावेर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व सध्या आमदार हरिभाऊ जावळे यांच्याकडे आहे. पुढील विधानसभा अथवा अन्य निवडणुकीसाठी त्यांनाही मतदार संघात कमळ फुलवणे गरजेचे आहे. सोबत ज्या तालुक्यामुळे मतदार संघाला ‘रावेर लोकसभा’ असे नाव मिळाले तेथील विजय खासदार रक्षा खडसे यांच्यासाठीदेखील आवश्यक आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कितीही मतभेद असले तरी ही निवडणूक उमेदवार, कार्यकर्त्यांऐवढीच नेत्यांसाठी सुद्धा प्रतिष्ठेची आहे. 

पहिली प्रचारताेफ मंगरुळमध्ये धडाडली 
उमेदवारीअर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत फेब्रुवारी अाहे. मात्र, तत्पूर्वीच शिवसेनेने गटनिहाय सभा, मेळावे घेण्याचे नियाेजन केले अाहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी मंगरूळ येथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली सभा घेण्यात अाली. त्यांनी कांॅग्रेस-राष्ट्रवादी या दाेन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांवर या सभेतून घणाघाती टीका केली. 
बातम्या आणखी आहेत...