आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळवून नेलेल्या मुलीच्या नावे पाेस्टातून चिठ्ठी पाठवून केला बनाव, पाेलिस तपास शून्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
चाळीसगाव - मेहुणबारे येथील इयत्ता ११ वी वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी वडिलांपाठाेपाठ अाराेपीच्या अाईसही अटक करण्यात अाली असून पळवून लावलेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या नावाने रजीष्टर पाेस्टाद्वारे पाेलिसांना चिठ्ठी पाठवून या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न संबंधित अाराेपीचे नातेवाईक किंवा त्यांच्या समाजाच्या काेणीतरी केला असल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांना अाहे. 
 
लव जिहादचा गुन्हा दाखल करण्याची मागणी फिर्यादी राजपूत कुटुंबीयाने केलाय. घटनेला १७ दिवस हाेेऊनही अाराेपी मिळून अाला नाही. शेख शोएब शेख मकसुद (वय २६) हा गावातून बेपत्ता असून त्यानेच मुलीस पळवून लावले असल्याचा संशय असल्याने त्याच्याविरुद्ध मुलीस फूस लावून पळवून लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. नंतर त्याचे वडील शेख मकसुद शेख दगडू मन्यार अाई महेबुदाबी शेख मकसुद यांनाही अटक करण्यात अाली. दि.१३ एप्रिल राेेजी चाळीसगाव येथील हिरापूर राेड, अादर्शनगरातील टपाल कार्यालयातून उपविभागीय पाेलिस अधिकारी, मेहुणबारे पाेलिस स्टेशनचे सहायक पाेलिस निरीक्षक यांना रजीष्टरद्वारे पळवून लावलेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या नावाने चिठ्ठी पाठवण्यात अाली अाहे. चिठ्ठीत म्हटले अाहे की, ‘मी माझ्या मर्जीने गेली असून मी सज्ञान झाली अाहे. माझ्या अाई, वडिलांनी शाेएब त्याच्या वडिलांवर खाेट्या केसेस केल्या अाहेत. पाेलिस यंत्रणा शेख शोएब शेख मकसुद या युवकाच्या वडील, अाई अथवा इतर सदस्यांकडून बेपत्ता असलेली बालिका युवकाचा पत्ता मिळवू शकले नाही. या प्रकाराने गावात संतप्त भावना व्यक्त हाेत असून तपास सुरू असल्याचे एकच कारण पाेलिस अधिकारी सांगताहेत. 
 
चिठ्ठीतीलबनाव झाला उघड 
‘त्या’मुलीच्या नावाने पाेलिस अधिकाऱ्यांना मिळालेली चिठ्ठी बनाव असल्याचा दाट संशय अाहे. पाेलिसांनी तिचे वहीवरील अक्षर चिठ्ठीतील अक्षर तपासले असता अक्षरात तफावत अाढळून अाली. शिवाय चिठ्ठीवर अंगठा मारलाय. बेपत्ता असलेली ती मुलगी अकरावी शिकली असताना ती सही करू शकते. तर मग चिठ्ठीवर अंगठा मारलाच कसा काय? शिवाय लिखाणातही अनेक चुका अाहेत. त्यामुळे पाेलिसांच्या हाती पडलेली चिठ्ठी म्हणजे बनाव असल्याचे उघड झालेय. 
 
गावातील लाेकांवर संशय 
फरार असलेल्या शेख शोएब शेख मकसुद याला संपूर्ण प्रकरणात गावातीलच काेणीतरी मदत करीत असल्याचा दाट संशय असून पाेलिसांना मिळालेल्या चिठ्ठीच्या अाधारे त्याचा छडा लावावा, अशी मागणी ‘त्या’ बालिकेच्या माता-पित्यांनी केलीय. 
 
चिठ्ठीप्रकरणी बारकाईने तपास सुरू 
- संपूर्ण प्रकरणाची सखाेल चाैकशी सुरू असून तपास उपनिरीक्षक अरविंद देवरे यांच्याकडे साेपवण्यात अालाय. टपाल कार्यालयातून अालेल्या चिठ्ठीतील अक्षरे इतर बाबी पडताळून पाहिल्या जात अाहेत. मुलीस पळवून घेऊन गेलेला तरुण परत यावा यासाठीच त्याच्या अाई, वडिलांना अटक केलीय. गावातील काही संशयितांवर पाेलिसांची नजर अाहे. या घटनेचा सखाेेला तपास करण्याबाबत जिल्हा पाेलिस अधीक्षकांकडूनही सूचना अालीय. लवकरच अाराेपीला अटक करू.
संजय शिरसाठ, सहायक पाेलिस निरीक्षक, मेहुणबारे 
बातम्या आणखी आहेत...