आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेल्या अार. जी. पाटलांचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून घरी जावून शाेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा परिषद निवडणुकीनंतर गट नाेंदणीसाठी उपलब्ध हाेत नसलेल्या काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अार. जी. पाटील अाणि त्यांच्या पत्नी तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या अरुणा पाटील यांचा काँग्रेसकडून शाेध सुरू अाहे. तीन दिवसांपासून फिरूनही पाटील दाम्पत्य मिळून अाल्याने शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्षांना घेऊन अार. जी. पाटील यांच्या घरी पाेहोचले. मात्र, तेथेही त्यांची निराशाच झाली. 
 
जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे चार सदस्य निवडून अाले असून सत्ता स्थापनेसाठी एक मत कमी असलेल्या भाजपची काँग्रेस सदस्यांवर नजर अाहे. त्यामुळे वेळेत गट नाेंदणी करावी म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी चितेंत अाहेत. जिल्ह्यात काँग्रसचे चार प्रदेश कार्यकारिणीवरील पदाधिकारी अाहेत. प्रत्येक प्रदेश पदाधिकाऱ्याने किमान एक सदस्य सांभाळल्यास जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी काँग्रेस निर्णायक भूमिका घेऊ शकते. परंतु काँग्रसचे चार सदस्य एकत्र अाणून त्यांची गट नाेंदणी करताना पदाधिकाऱ्यांचे नाकीनऊ अाले अाहे. 
 
मुलाचा केला सत्कार 
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील हे तीन दिवसांपासून पाटील दाम्पत्याचा शाेध घेत अाहेत. शुक्रवारी सायंकाळची वेळ निवडून त्यांनी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी अामदार शिरीष चाैधरी, प्रदेश सचिव डी. जी. पाटील, माजी अामदार रमेश चाैधरी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर साेनवणे, महानगर कार्याध्यक्ष राधेश्याम चाैधरी यांच्यासह अार.जी. पाटील यांच्या रिंगराेड येथील निवासस्थानी गेले हाेते. परंतु तेथेही पाटील दाम्पत्य मिळून अाले नाही. काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी अार. जी. पाटील यांच्या एेवजी त्यांच्या मुलाचा सत्कार करून माघारी परतले. 
 
माजी अामदार शिरीष चाैधरींकडून नाराजी 
पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊनही अार. जी. पाटील सहकार्य करत नाहीत, संपर्कात राहत नाहीत. तसेच गट नाेंदणीला येत नसल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी अामदार शिरीष चाैधरी यांनी नाराजी व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...