आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार अामचे नव्हे अापले; अर्थात भाजप-सेनेचे; मंत्री गुलाबराव पाटील यांना जावळेंचा चिमटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंचावर चर्चा करताना माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, मंत्री गुलाबराव पाटील. - Divya Marathi
मंचावर चर्चा करताना माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, मंत्री गुलाबराव पाटील.

भुसावळ- ‘सेल्फीविथ खड्डे’चा धागा पकडून शिवसेना उपनेते तथा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ‘अाम्ही किमान भाषणांतून खड्ड्यांबाबत बाेलताे. सत्ताधारी भाजपेयींना मात्र, हा विषय खासगीत बाेलावा लागताे’. हे एेकताच भाजपचे अामदार हरिभाऊ जावळे म्हणाले, ‘सरकार अामचे नव्हे अापले, अर्थात भाजप-सेनेचे अाहे’. त्यावर पुन्हा गुलाबरावांनी ‘परंतु सरकार नेमके काेणाचे हेच जनतेला कळत नाही’, असा चिमटा काढला. 


भुसावळात ग.स.साेसायटी शाखेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रविवारी झाले. त्यात ही राजकीय टाेलेबाजी रंगली. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री अामदार एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, अामदार संजय सावकारे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भाेळे, रावेरचे माजी अामदार शिरीष चाैधरी, ग.स. साेसायटीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित हाेते. राजकीय जाेडे बाजूला सारून नेते सहकारात एकत्र येतात. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हाच कित्ता गिरवून एकत्र यावे, अशी अपेक्षा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. त्यांचे भाषण चिकित्सकपणे एेकून घेतल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे अध्यक्षीय भाषणासाठी उभे राहीले. जळगाव जिल्ह्यात कृषी महाविद्यालयासह अन्य सहा माेठ्या प्रकल्पांची मंजुरी रद्द झाली. अागामी काळात जनतेला काय उत्तर देणार? असा प्रश्न अाहे. मंजूर प्रकल्प नामंजूर करणे ही बाब जिल्ह्याच्या विकासाला बाधक अाहे, अशी खंत व्यक्त करून जळगाव जिल्ह्याचा दबावगट असावा, अशी भूमिका त्यांनी या कार्यक्रमात अावर्जून मांडली. 


शेतकरी अंगावर धावून येतात 
शेतकरी कर्जमाफीचा संभ्रम कायम अाहे. एक माहितीची सीडी पाठवली, की दुसरी मागवली जाते. नुसता खेळ सुरू अाहे, असा टाेलाही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मारला. त्यांच्या याच विधानाचा धागा पकडून माजी मंत्री खडसे म्हणाले, राज्य शासनाचा कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. मात्र, त्याचे क्रेडिट आम्हाला का घेता येत नाही? संभ्रम दूर होत नसल्याने आता शेतकरी अंगावर धावून येण्याच्या तयारीत असतात, असे सांगताच खसखस पिकली. 


दबाव गट हवा 
भुसावळातीलकार्यक्रम सहकार क्षेत्राशी निगडित असला तरी निमंत्रित अाजी-माजी मंत्र्यांनी राज्यसरकारवरच राेष व्यक्त केल्याचे चित्र समाेर अाले. जिल्ह्याच्या दबावगटासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी बैठक बाेलवावी, अापण नक्कीच उपस्थिती देऊ, अशी ग्वाही माजी मंत्री खडसे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...