आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका, अामदार गाेटेंच्या कृतीचा कडाडून विरोध, बचाव समितीची स्थापना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनुमान मंदिर कालिका माता मंदिराच्या मधोमध होणारा रस्ता. - Divya Marathi
हनुमान मंदिर कालिका माता मंदिराच्या मधोमध होणारा रस्ता.
धुळे - पांझरानदीवर अामदार अनिल गाेटे यांनी तळफरशीचे काम सुरू केले अाहे. त्यासाठी पंचमुखी मारुती कालिकादेवी मंिदरामधून रस्ता काढला. मंदिराचे बांधकाम पाडले. ही दाेन्ही मंदिरे हटवण्यासाठी अामदारांनी दाेन्ही मंदिरातून रस्ता काढून ट्रायल घेतली. त्यांच्या या भूमिकेचा मंगळवारी सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी कडाडून विराेध केला. मंदिर काेणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही, अशी भूमिका घेत सर्वपक्षीय मंदिर बचाव समितीची स्थापना करण्याचा निर्णयही झाला. कालिकादेवी मंिदरात ही बैठक झाली.
अामदार अनिल गाेटे यांनी मंिदराच्या परिसरातील बांधकाम पाडले. त्याचा विराेध करण्यासाठी पांझरा काठावरील कालिकादेवी मंिदरात मंगळवारी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी िरपब्लिकन पार्टीचे सरचिटणीस एम.जी. धिवरे हाेते. बैठकीला िशवसेनेचे नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भूपेंद्र लहामगे, भगवान गवळी, प्रशांत श्रीखंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनाेज माेरे, मनपा सभागृह नेते कमलेश देवरे, नगरसेवक सुनील साेनार, माजी नगरसेवक मनाेज वाल्हे, अनिल खंडेलवाल, प्रवीण अग्रवाल, श्रीकांत गिंदाेडिया, सुनील वाघ, संभाजी गवळी, राजेश पटवारी, अानंद बागुल, संदीप सूर्यवंशी, राजेंद्र जैन नागरिक उपस्थित हाेते. बैठकीत नरेंद्र परदेशी यांनी भूमिका मांडली. त्यात या दाेन्ही मंिदरांच्या पाठीमागे जागा असताना जयहिंद जलतरण तलावापासून हा रस्ता सरळ असताना अामदारांनी हेतुपुरस्सर दाेन्ही मंिदरांमधून रस्ता काढण्याचा अाग्रह धरला. त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरले. नदीच्या काठावर ग्रीन झाेन अाहे. त्यामुळे तेथे काेणतेही काम हाेऊ शकत नाही. तसेच नदी ही नाेटिफाइड म्हणजे नाेंदणी करण्यात अाली अाहे. त्या ठिकाणी पाइप माेरीचे काम हाेऊ शकत नाही. तळफरशीच्या नावाने अंदाजपत्र तयार करून त्याला मंजुरी घेण्यात अाली. तसेच या कामासाठी नगावबारी परिसरात असलेल्या पाइपांची मागणी अामदारांनी केली अाहे. अामदारांच्या या हटवादी भूमिकेविराेधात अाता जनतेने एकत्रितपणे लढा देणे गरजेचे अाहे. ही दाेन्ही मंिदरे पाडण्यापूर्वी लाेकांचा किती विराेध हाेताे हे पाहण्यासाठी बांधकाम मंिदरांमधील जागेतून केले जात अाहे. त्या विराेधात संघटितपणे उभे राहिले पाहिजे.
बैठकीत अनेकांनी मते मांडली. तसेच अतिक्रमण काढण्यास विराेध नाही. अामदारांच्या या भूमिकेमुळे शहरातील शांततेला धाेका निर्माण हाेऊ शकताे. त्यातून काही घडल्यास त्याची जबाबदारी ही अामदारांची असणार अाहे, अशी मते मांडली गेली. तसेच अामदारांकडून राजकीय पक्षांची कार्यालये, मंदिराची यादी देऊन कारवाई करण्याची मागणी केली गेली. मात्र, त्यांचे स्वत:चे घर अतिक्रमणात अाहेत. ते प्रथम पाडावे. या वेळी सर्वानुमते अामदारांच्या मंदिर पाडण्याच्या भूमिकेचा विराेध करण्यासाठी मंदिर बचाव समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्याला उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दर्शविला.

या समितीचे पदाधिकारी लवकरच जाहीर करून पुढील अांदाेलनाचा निर्णय समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती या वेळी नरेंद्र परदेशी यांच्याकडून देण्यात अाली. सूत्रसंचालन अाभार प्रदर्शन धीरज पाटील यांनी केले. याप्रसंगी वसंत पिंगळे, निंबा ठाकरे, विजय पाटील, भरत माेरे, कुमार डियालानी, अशाेक गवळी, शिवा शिरसाळे, डाॅ. सचिन चिंगरे, दिनेश पाटील उपस्थित हाेते.

-देश धर्मनिरपेक्षअाहे. प्रत्येक धर्माला यात अधिकार अाहे. मात्र, मंदिर ताेडणे हे काेणालाही मान्य हाेणार नाही. शहराची शांतता धाेक्यात अाल्यास त्याला अामदारच जबाबदार राहतील. अध्ययन केंद्राचेही अतिक्रमण नाही. हा प्रश्न शहराच्या अस्मितेचा, श्रद्धेचा अाहे. त्याला काेणी गालबाेट लावत असेल तर शांत बसून चालणार नाही.
-एम.जी. धिवरे, रिपब्लिकन पार्टी

आमदार देतात खोटी माहिती
-अामदारनेहमीचखाेटी माहिती देऊन दिशाभूल करतात. शहरात झालेल्या दंगलीच्या वेळी ते काेणालाही वाचवायला अाले नाही. त्यांनी तयार केलेल्या चाैपाटीचे उत्पन्न वाढावे यासाठी ते तळफरशीचे काम करीत अाहेत. त्यांनी इतर अतिक्रमण काढावे. त्यांच्या मंदिर पाडण्याच्या धर्माविराेधी भूमिकेच्या विराेधात पक्षासह सर्व जण सहभागी हाेऊन त्याला विराेध केला जाईल. त्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे.
-मनाेज माेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
बातम्या आणखी आहेत...