आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:पाडव्याला दुकानाचे उद्घाटन; 20 लाखांचे मोबाइल चोरीस, चोरटा सीसीटीव्हीत कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरीची माहिती देताना दुकान मालकाच्या डोळ्यात अश्रू तराळले. - Divya Marathi
चोरीची माहिती देताना दुकान मालकाच्या डोळ्यात अश्रू तराळले.
जळगाव- कोर्ट चौकातील जे.टी.चेंबरमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन झालेल्या दुकानात गुरुवारी मध्यरात्री धाडसी चोरी करण्यात आली. तोंडाला पट्टी बांधलेल्या एका चोरट्याने २० लाख रुपये किमतीचे १५० नवे कोरे मोबाइल लंपास केले. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास दुकानामध्ये घुसलेला हा चोरटा सुमारे दीड तास शोधाशोध करीत होता. त्या दरम्यान त्याने एक फाेन काॅल केला आणि त्यानंतर दीडशे मोबाइल चार्जरसह बॅगेत भरून रात्री दीड वाजता दुकानातून पोबारा केला. दोन चोरटे असावेत, असा संशय असून या चोरट्यांनी केवळ नव्या मोबाइलवरच डल्ला मारला. दुरुस्तीसाठी आलेल्या मोबाइल्सला हातही लावला नाही हे विशेष. चोरीची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्या वेळी पोलिसांना माहिती देताना नव्या दुकानाचे मालक राजेंद्र बारी यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. मोठ्या मेहनतीने उभारलेल्या दुकानात चोरी झाल्यामुळे त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. 
 
जे. टी. चेंबरमधील जी-१ क्रमांकाच्या दुकानात राजेंद्र अरुण बारी (वय ३०, रा. श्रीकृष्णनगर, जुने जळगाव) अाणि पुरुषाेत्तम अरुण बारी या दाेन्ही भावांच्या मालकीचे वायरलेस वर्ल्ड नावाचे माेबाइलचे दुकान अाहे. त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी दुकानाचे उद्घाटन केले. गुरुवारी रात्री ९.३० वाजता त्यांनी दुकान बंद केले. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता नीलेश झेराॅक्सचे मालकांना बारी यांच्या दुकानाचे शटर तुटलेले दिसले. त्यांनी बारी यांना फाेन करून कळवले. बारी यांनी दुकानात जाऊन बघितले असता, दुकानाचे शटर उचकावून चाेरी झाल्याचे निदर्शनास अाले. 
 
6 ठिकाणी कट मारून ताेडले लाॅक : वायरलेसवर्ल्ड या दुकानाच्या शटरच्या सेंटर लाॅकच्या अाजूबाजूला चाेरट्यांनी सहा ठिकाणी कटरने कापले. त्यानंतर सेंटर लाॅक ताेडूनगुरुवारीरात्री ११.५७ वाजता एका चाेरट्याने दुकानात प्रवेश केला. त्याच्या ताेंडाला रुमाल बांधलेला हाेता. त्यानंतर काहीवेळ चाेरट्याने दुकानात माेबाइल शाेधले. 
 
मात्र, त्याला माेबाइल सापडले नाही. त्यामुळे १२.०३ वाजता त्याने काेणाला तरी फाेन केला. त्यानंतर काउंटरच्या खालील ड्राॅव्हर ताेडले. त्या ड्राॅव्हरमधून अाेप्पाे, विवाे, जीअाेनी कंपनीचे २० लाख रुपये किमतीचे १५० माेबाइल चार्जर काढून बॅगेत भरले. चाेरट्याने खाेके दुकानातच फेकून दिले. काही महागड्या कंपनीचे माेबाइल दुरुस्तीसाठी अालेे हाेते. मात्र, चाेरट्याने त्या माेबाइलांना हातही लावला नाही. रात्री १.३२ वाजता चाेरटा शटरच्या खालून पसार झाला. त्याचा एक साथीदार बाहेर लक्ष ठेऊन हाेता. 
 
खालच्या दुकानाच्या बाेर्डमुळे अाडाेसा 
वायरलेस वर्ल्ड या दुकानाच्या शटरचे लाॅक ताेडताना चाेरट्याला तळमजल्यावरील दुकानाच्या बाेर्डचा अाडाेसा मिळाला. दुकानाचा बाेर्ड माेबाइल दुकानाच्या समाेर असलेल्या ग्रीलला लावलेला अाहे. त्यामुळे चाेरट्याने त्याचा अाडाेसा घेत खाली १२ मार्चचे वर्तमानपत्र टाकून खाली झाेपून शटर ताेडल्याचा पाेलिसांना संशय अाहे. 
 
माेबाइल दुरुस्ती तसेच माेबाइल कंपन्यांमध्ये सेल्समनचे काम करून बारी बंधूनी कष्टाने २८ मार्च राेजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वायरलेस वर्ल्ड नावाचे माेबाइलच्या शाेरूमचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर नवव्या दिवशी म्हणजे एप्रिलला चाेरट्यांनी दुकानातील २० लाखांच्या माेबाइलवर डल्ला मारला. माेबाइल दुकानात चाेरी झाल्याची माहिती ९.३० वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पाेलिसांना दिली. त्यानंतर तासाभराने पाेलिसांचा ताफा घटनास्थळावर पाेहाेचला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यात तोंडाला रुमाल लावलेल्या चोरट्याच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या. फिंगर प्रिंट तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी करून चोरट्याच्या हातांचे ठसेही मिळवले. 
 

चोरट्याने २० लाख रुपये किमतीचे १५० माेबाइल केले लंपास... व्हिडिओ पाहार्‍यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर क्लिक...
बातम्या आणखी आहेत...