आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 लाखांचे मोबाइल चाेरटे नेपाळमध्ये पसार, बिहारमधील दोन संशयितांना औरंगाबादमध्ये अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हाकोर्टासमाेरील मोबाइलच्या दुकानातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात १६ लाख रुपये किमतीचे १२४ माेबाइल चोरणारे चोरटे बिहारमार्गे नेपाळला पसार झाले आहेत. या चोरी प्रकरणातील दाेघांना अाैरंगाबाद पाेलिसांनी अटक केली अाहे. 

राजेंद्र अरुण बारी अाणि पुरुषोत्तम अरुण बारी या दाेन्ही भावांचे जे. टी. चेंबरमधील जी- हे वायरलेस वर्ल्ड नावाने माेबाइलचे दुकान अाहे. या दुकानाचे गुढीपाडव्याला उद््घाटन झाले हाेते. या दुकानाच्या शटरचे सेंटर लाॅक कापून चाेरट्यांनी एप्रिल रोजी १६ लाख रुपये किमतीचे १२४ माेबाइल लंपास केले हाेते. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. 

अाैरंगाबादेत दाेघांना अटक 
अाैरंगाबादमध्येहीअशाच प्रकारे चाेरी झाली हाेती. याप्रकरणी अाैरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच दिवसांपूर्वी दाेन संशयितांना हाेडासन येथून अटक केली अाहे. त्यांची कारवाई झाल्यानंतर जिल्हापेठ पाेलिस त्यांना ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळाली अाहे. मोबाईल चोरी प्रकरणी पोलिसांची शोधमोहिम सुरु आहे. 
 
पाेलिसांचे पथक बिहारमध्ये
बिहारमधीलहाेडासन हे गाव नेपाळच्या सीमेवर अाहे. या गावापासून केवळ तीन ते चार किलाेमीटरवर नेपाळची सीमा अाहे. या गावातील एक माेठी टाेळी फक्त माेबाइलची दुकाने फाेडून चाेऱ्या करण्यात पटाईत अाहे. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर एलसीबी अाणि जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे पथक बिहारमध्ये हाेडासन येथे गेले हाेते. मात्र, पाेलिस पथक जाण्या अगाेदरच हाेडासन येथील चाेरट्यांची टाेळी सीमेपलीकडे नेपाळमध्ये पसार झाल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. दाेन दिवस त्या परिसरात थांबवून चाेरट्यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. 

माेबाइल नेपाळात विक्रीचा संशय 
देशभरातून चाेरून आणलेले माेबाइल हे चाेरटे नेपाळमध्ये विक्री करीत असल्याचा पाेलिसांना संशय अाहे. तसेच त्यांना पकडण्यासाठी गेल्यावर ते सहजरीत्या नेपाळच्या हद्दीत पळून जातात. त्यामुळे माहीत असूनही पाेलिसांना या चोरांना अटक करता येत नाही. या चाेरट्यांच्या शोधासाठी चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, नागपूर तसेच देशातील अनेक ठिकाणची पाेलिस पथके येथे अाल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
 
बातम्या आणखी आहेत...