आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : भरपावसात रिधूरवाड्यामधील माेबाइल टाॅवरने घेतला पेट, सुदैवाने जीवित हानी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरपावसात पेटलेला मोबाइल टॉवर. - Divya Marathi
भरपावसात पेटलेला मोबाइल टॉवर.
जळगाव - शहरातील रिधूरवाडा परिसरातील एका घरावर असलेल्या मोबाइल टॉवरने रविवारी रात्री अचानक पेट घेतला. बाहेर पाऊस सुरू असताना रबराच्या वायरींचा मोठा भडका झाला होता. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही. दरम्यान, ऑपरेटर उशिरा आल्यामुळेच ही आग वाढल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी केला आहे. 
 
रिधूरवाड्यात राहणारे मनोज एकनाथ चौधरी यांच्या घरावर बीएसएनएल कंपनीचे माेबाइल टाॅवर आहे. रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास टॉवरच्या जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे धूर निघायला लागला. हे समजताच घरमालक चौधरी यांनी टॉवरचे ऑपरेटर हेमंत राणे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. दरम्यान, राणे हे एक तास उशिरा टॉवरजवळ पोहाेचले. तत्पूर्वी हा धूर वाढत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी भीतीपोटी जनरेटर उघडून ताे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला; परंतु तात्पुरती दुरुस्ती करूनही आग वाढत हाेती. त्यानंतर ७.४५ वाजता अागीने मोठा भडका घेतला. त्यामुळे टॉवरच्या वरच्या भागात असलेल्या वायरींनी पेट घेतला. दरम्यान, पावसाचे पाणी पडत असतानाही या जाड वायरींचा भडका उडाला ताे वाढत गेला. या घटनेमुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले. तर रात्री ८.३० वाजेच्या सुमरास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश अाले. चौधरी यांच्या घरावर गेल्या सात-आठ वर्षांपासून हे टॉवर उभे आहे. 
 
नागरिकांची धावपळ 
रिधूरवाडा, शनिपेठ हा परिसर गजबजलेला अरुंद गल्ल्यांचा आहे. दाटीवाटीने असलेल्या घरांमुळे या भागात मोठी वाहने जाण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक राहत नाही. अशातच टाॅवरला लागलेल्या अागीनंतर नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. लहान मुलांना आगीपासून वाचवण्यासाठीच माेठा गोंधळ उडत असल्याचे या वेळी दिसून अाले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, अग्निशामक बंब पोहाेचण्यास उशीर... 
बातम्या आणखी आहेत...