आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाई-वडिलांप्रती मनात कायम कृतज्ञता ठेवून कर्मयाेगी व्हावे - पद्मविभूषण डाॅ. के. एच. संचेती यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जीवनात प्रत्येक व्यक्तीने पाच गाेष्टींचा अवलंब करायला हवा. यात साधेपणा, माणुसकी, जे काही तुमच्याकडे अाहे ते देत राहण्याची भावना, अाई-वडिलांप्रती कृतज्ञतेची भावना अाणि ज्या प्रसंगांनी तुम्हाला त्रास हाेईल, असे प्रसंग टाळावे. तुमच्यात कितीही गुण असतील; मात्र तुम्ही कर्मयाेगी नसाल तर उपयाेग नाही, म्हणून कर्मयाेगी बना असे प्रतिपादन पद्मविभूषण डाॅ. के. एच. संचेती यांनी केले. 
 
दीपस्तंभ प्रेरणा पुरस्कारांचे वितरण रविवारी कांताई सभागृहात झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मविभूषण डाॅ. के. एच. संचेती, उमविचे कुलगुरू डाॅ. पी. पी. पाटील, रेखा महाजन, नीळकंठ गायकवाड, संध्या सूर्यवंशी यजुर्वेंद्र महाजन उपस्थित हाेते. 
 
या वेळी दीपस्तंभ जीवनगाैरव पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव अरुण बाेंगीरवार, लता बाेंगीरवार, दीपस्तंभ विवेकानंद पुरस्कार प्रज्ञाचक्षू व्यक्तींसाठी विशेष कार्य केलेले स्वागत थाेरात अानंदयात्रा स्वयं हे उपक्रम चालवलेले नवीन स्नेहल काळे, ज्ञानप्रबाेधिनी संस्था अंबाजाेगाईचे अभिजित जाेंधळे, दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार शिवम प्रतिष्ठानच्या सुवर्णा बागल यांना, दीपस्तंभ संघटना पुरस्कार मैत्र मांदियाळी जालना मारवाड विकास मंच अमळनेर यांना प्रदान करण्यात अाले.
 
 दीपस्तंभच्या मनाेबल केंद्राच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात अाली हाेती. दिव्यांग विद्यार्थी प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांच्या हस्ते पुरस्कारार्थी मान्यवरांचे स्वागत करीत पुरस्कार देण्यात अाले. प्रा. राजेंद्र चव्हाण यजुर्वेंद्र महाजन यांनी सूत्रसंचालन, तर श्रुती बोरसे यांनी अाभार मानले.
 
कार्यक्रमात पाेलिस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे, शरद जोशी, डॉ. भंडारी, अखिल तीलकपुरे, महेंद्र कोठारी, योगाची राष्ट्रीय खेळाडू शिवानी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. के. एच. संचेती यांनी मनोबल केंद्रास लाख रुपये, तर बोंगीरवार यांनी ५१ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली.

‘दीपस्तंभ प्रेरणा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारप्राप्त (डावीकडून) स्नेहल नवीन काळे, स्वागत थोरात, माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार लता बाेंगीरवार, पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील, अभिजित जोंधळे, सुवर्णा बागल, तर दुसऱ्या छायाचित्रात मनाेगत व्यक्त करताना पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती. 
 
अभिजित जाेंधळे म्हणाले, अापल्याला काेणत्या क्षेत्रात जायचे अाहे याचा कल कळायला हवा, समाजात विविध पद्धतीचे लाेक कार्य करत अाहेत. त्यांच्यापर्यंत पाेहोचण्याचे काम अाम्ही करताे, ते दिवाळी अंकातून मांडताे. फक्त लिहीत नाही तर त्यांना जुळताे. 
 
स्वागत थाेरात यांनी मी प्रज्ञाचक्षूंचे अायुष्य स्वत: जगून पाहिले अाणि समजले, की जेव्हा डाेळे नसतात तेव्हा शरीरातील इतर ज्ञानेंद्रिये हे अधिक ताकदीने कार्य करतात, माझेही तसेच झाले. तेव्हापासून मी मुलांसाठी काम करताे. 
 
अरुण बाेंगीरवार म्हणाले की, समाजासाठी चांगले कार्य करायचे असेल तर शासकीय नाेकरीतून तुम्हाला ती संधी मिळते. वडिलांच्या प्रेरणेमुळे मी अायएएस झालाे. सकारात्मक पद्धतीने अायुष्य जग असे काम कर, की ज्यामुळे इतरांना अानंद मिळेल; अशी त्यांनी शिकवण दिली त्याच मार्गाने जगलाे, असे सांगताना त्यांना अाई-वडिलांच्या अाठवणींनी अश्रू अनावर झाले.
 
 
सुवर्णा बागल यांनी कॉलेज वयात मला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, “परिस्थिती’ या शब्दाला मी थारा दिला नाही. तेथूनच सामाजिक कामाची ओढ लागली. ग्रामीण भागात काम करून ग्रामीण तरुणांना प्रेरित करणं आवश्यक आहे. 
बातम्या आणखी आहेत...