आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदन, मुलतानी मातीनेे घामोळ्यांपासून सुटका, वाचा लहान मुलांसाठी कशी घ्याल विशेष काळजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
जळगाव - असह्य वाटणारा उन्हाळा सुसाह्य करण्यासाठी नानाविध उपाय योजले जातात. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे शरीर अधिक घामाघूम होत असते. यात घामोळ्यांची समस्या प्रत्येकाला सतावत असते. यातून सुटका करण्यासाठी बाजारात पावडरही विक्रीस उपलब्ध आहे. मात्र, त्याने तात्पुरता फरक पडत असतो. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात सतावणाऱ्या घामोळ्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी अनेक घरगुती उपाय करू शकतात. यात चंदन पावडर, मुलतानी माती, गुलाबजल, वाळा यासारखे नैसर्गिक साहित्याचा वापर करणे शक्य आहे. 
 
चंदनामुळे शरीराची दाह थंडावेल 
अंघोळीच्या वेळेस उटणे लावावे. वाळा, नागरमोथा, चंदन, कापूर काचरी, त्रिफळा, मसुरीच्या डाळीचे पीठ, अांबेहळद हे सर्व साहित्य एकत्र करायचे अंघोळीच्या १० मिनिटे अगोदर लावावे. एक दिवसाआड हे लावल्यास फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे अांब्याची काेयदेखील घामाेळ्यांकरिता चालते. कैरी उकडून त्या मधील काेय ही पाण्यात भिजवून ठेऊन ते पाणी अंघोळीला वापरावे. तसेच उन्हाळ्यात शरीरात सतत पाण्याची कमतरता जाणवते. यामुळे सतत द्रव्य पदार्थांचे सेवन करावे. फळांच्या रसाचे सेवन करावे. तसेच मुलतानी मातीचा लेप लावल्याने घामोळ्यांपासून चांगला आराम मिळतो. मुलतानी मातीचा त्वचेकरिता खूप चांगला उपयाेग असून त्वचेची जळजळ कमी होते, मुलायम त्वचा हाेते. कोरफडीचा गरही घामोळ्यांवर लावल्यास समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर उन्हाळ्यात त्वचेची जळजळ होत असल्यास त्या ठिकाणी चंदनाचा लेप लावावा. चंदनामुळे थंडावा मिळतो. चंदनाचे पाणीदेखील अनेक जण पितात. यामुळे शरीरातील दाह कमी हाेत असताे. 
 
घामाेळ्यांकडे दुर्लक्ष करता उपचार करावा 
- शरीरावर जीथे घाम जमा होतो, तिथे घामाेळ्या जास्त होतात. परिणामी घामाेळ्यांचे स्वरुप संसर्ग अाणि माेठे फाेड हाेण्यापर्यंतही जाते. लालसर हाेतात, अनेकदा रक्त येते. त्यामुळे घामाेळ्यांकडे दुर्लक्ष करू नये. अायुर्वेदिक उपाय करावा. पाणी खूप प्यावे. घाम जमा हाेऊ देऊ नये. अधिक त्रास झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच चंदन, गुलाब जल यासारखे थंड नैसर्गिक साधनांचा वापर करणे या दिवसात याेग्य ठरते.
डाॅ.अानंद दशपुत्रे, आयुर्वेद तज्ज्ञ 
 
पुढील स्लाइडवर वाचा, लहान मुलांसाठी घ्या विशेेष काळजी... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...