आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या जीर्ण इमारतीचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे स्थलांतरण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देवूनही सत्ताधारी आणि प्रशासन निर्णय घेत नसल्याची स्थिती आहे. ब्रिटिशकालीन जीर्ण इमारतीची स्थिती विदारक असतानाही पालिकेने आता कागदी घोडे नाचवत इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा समोर आणला आहे. या ऑडिटमधून पालिका इमारतीची मलमपट्टी करुन पालिकेचा प्रशासकीय कारभार चालवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
 
पालिकेचे सध्याची इमारत १९३५ मध्ये उभारण्यात आली होती. जुन्या इमारतीच्या उभारणीस तब्बल ८२ वर्षांचा काळ लोटला आहे. तर दर्शनी भागातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आणि त्यावरील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बांधकाम विभागाचे दालन यांचे बांधकाम सन १९८१ मध्ये करण्यात आले होते. या बांधकामालाही तब्बल ३५ वर्ष झाले आहेत. या इमारतीची अवस्था बिकट झाली असून, काही ठिकाणी प्लास्टर निखळले आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एप्रिलला नगरपालिकेत भेट दिल्यानंतर कामकाज स्थलांतरीत करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतर आता पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने याच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन डागडुजीचे नियोजन केले आहे. 

स्ट्रक्चरलऑडिट असे : सर्वेक्षणकरून ज्या ठिकाणी दुरूस्ती अावश्यक आहे, त्या ठिकाणी आवश्यक बदल, मजबुतीकरणासाठी उपाययोजना वास्तुतज्ञांमार्फत सूचवल्या जातील. मात्र, ब्रिटिशकालीन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करुनही त्यातून काय निष्पन्न होईल, याबाबत शंकाच आहे. एकंदरीत स्ट्रक्चरल ऑडिटमधून डागडूजी करण्याचे प्रयत्न करुन याच जीर्ण इमारतीमधून कारभार चालवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. दालनचकाचक, आतून पोकळ : पालिकाइमारतीमधील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बांधकाम समिती सभापती, शिक्षण सभापती, बांधकाम विभाग, गटनेता कक्ष आदी दालने चकाचक असली तरी आतून मात्र पोकळ झाली आहेत. त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. 

मार्गदर्शन घेऊ 
Ãपालिका इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल. पालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान असल्याने प्राप्त साधनसामुग्रीचा वापर करून कारभार चालवण्यावर भर आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर डागडुजी करून पालिकेची इमारत सुस्थितीत आणली जाईल. रमणभोळे, नगराध्यक्ष, भुसावळ 

ब्रिटिशकालीन इमारतीची अशी वाताहत 
पालिकेच्या इमारतीच्या दर्शनी भागातील बांधकामावर पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीला अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. तर जुन्या बांधकामावरील कौलारु छतही जीर्ण झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाच्या दालनाजवळील कौले आणि छताचा भाग कोसळला. यासह बहुतांश सर्वच विभागातील छताची स्थिती गंभीर आहे. 

नवीन इमारतीसाठी प्रयत्न 
पालिका प्रशासनाने नवीन इमारत बांधकाम करण्याचेही नियोजन केले आहे. शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोरील नियोजित एसी संकुलाच्या जागेवर या भव्य इमारतीचे निर्माण केले जाणार आहे. मात्र सध्यातरी आता वापरात असलेली प्रशासकीय इमारतीची डागडुजी करुन कामकाज चालविण्याचे प्रयत्न आहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...