आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमुक्तीसाठी गाळे, घरकुले, जागा विक्रीसह सर्व पर्याय खुले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिका कर्जमुक्तीसाठी पुन्हा एकदा चर्चेच्या माध्यमातून नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. खाविआच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी बुधवारी पालकमंत्री एकनाथ खडसेंची भेट घेतली. त्यामुळे आता सकारात्मक वाटचाल सुरू होईल, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. कर्जमुक्तीसाठी गाळेकरार, घरकुले जागा विक्रीसह अन्य पर्यायदेखील खुले ठेवावे लागणारा आहेत. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंसोबत बैठक निश्चित करून कर्जफेडीसाठी मार्ग काढला जाईल, असे ठोस आश्वासन या बैठकीत दिले.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील सत्ताधारी खान्देश विकास आघाडी पालकमंत्री खडसे यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. दोघांमध्ये एकमत होत नसल्याने खडसेंनी कर्जफेडीच्या विषयात लक्ष घालण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर खाविआच्या नेत्यांनी खडसेंच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. ठरल्याप्रमाणे बुधवारी दुपारी वाजता खाविआचे नेते रमेश जैन, नितीन लढ्ढा, महापौर राखी साेनवणे, उपमहापौर सुनील महाजन, नितीन बरडे, श्यामकांत सोनवणे अमर जैन यांनी सुमारे ४५ मिनिटे पालकमंत्री खडसेंशी चर्चा केली. त्यात खडसेंनी खाविआच्या नेत्यांनी मध्यंतरी घेतलेल्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच कर्जमुक्तीसाठी मी प्रयत्न करणारच आहे, हेदेखील स्पष्ट केले. या वेळी सकारात्मक चर्चेतून पालिकेला हुडकोच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी विनंती करण्यात येऊन महापालिकेने तयार केलेला २८ कोटींचा प्रस्तावही देण्यात आला.

घरकुल विक्रीचा खाविआचा पर्याय
मनपाचीहजार घरकुलांची योजना अपूर्णावस्थेत आहे. अपूर्ण असलेली ही घरकुले म्हाडाने विकसित करून त्यांची बुकिंग करावी. तसेच म्हाडानेच आपल्या निकषांनुसार त्या घरकुलांची विक्री करावी त्यातून मिळणारे उत्पन्न हुडकाेच्या खात्यात जमा करावे. याशिवाय मनपावरील कर्जाचा बोजा कमी करावा, असा प्रस्तावही खाविआतर्फे देण्यात आला. त्यावर खडसेंनी यासाठी महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली.

^पालकमंत्री एकनाथ खडसेंची भेट घेऊन पालिकेच्या परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. हुडकोचे कर्ज फेडायचे असल्याने मार्ग काढण्यासाठी प्रस्तावही दिला आहे. राजकारणापेक्षा आम्हाला शहराचा विकास हवा आहे. त्यासाठी आम्ही खडसेंची भेट घ्यायला गेलो होतो. रमेशजैन, अध्यक्ष,
खाविआ नायडूंशी यापूर्वीच केली चर्चा
खडसेंनीयापूर्वीच केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंशी चर्चा केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नायडूंशी बोलून वेळ घ्यायची आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली स्वत: खडसे, महापौर, आयुक्त, दाेन्ही खासदार, महत्त्वाचे पदाधिकारी अधिकारी जातील, असेही खडसेंनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.

राज्याकडूनकेंद्राकडे जाणार प्रस्ताव
याबाबतमहापालिका आयुक्तांनी तयार केलेला प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर करून त्याची छाननी केली जाईल. त्यानंतर राज्य शासनाच्या मान्यतेने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे रवाना केला जाणार अाहे. प्रस्ताव पोहोचल्यानंतर मीटिंगची तारीख निश्चित करून प्रत्यक्ष भेट घेतली जाईल. त्यात महापालिकेवरील कर्जाबाबत मार्ग काढला जाणार आहे.

पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करताना खाविआचे नेते रमेश जैन, नितीन लढ्ढा, महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, नितीन बरडे, श्यामकांत साेनवणे अमर जैन.
आम्हाला शहराचा विकास हवाय, गाळ्यांतून १६० कोटी अपेक्षित
खाविआच्यापहिल्या फळीतील नेते भेटीसाठी आल्याने खडसेंची नाराजी काहीअंशी दूर झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या वेळी झालेल्या चर्चेत खडसेंनी फुले सेंट्रल फुले मार्केटच्या माध्यमातून १५० ते १६० काेटी मिळायला हवेत, असे मत मांडले. मात्र, त्यातून कर्जफेड करणे शक्य नसल्याने मनपाच्या दोन्ही जागा विक्री करण्याचा पर्यायही खडसेंनी बोलून दाखवला. त्यासाठी ई-टेंडरिंग करा. विक्री करताना सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था करण्याची अट घालावी.