आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने थकवले ‘गस’ कर्जदारांचे पावणे काेटी, पगारातून कपात केलेल्या रकमा भरल्याच नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सरकारी कर्मचाऱ्यांना मागेल तेव्हा कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या ग.स.साेसायटीलाही अाता महापालिकेच्या चकरा मारण्याची वेळ अाली. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे पगारातून कापले; परंतु ग.स.साेसायटीत वर्ग केल्याने पालिकेचे हजारापेक्षा जास्त कर्मचारी थकबाकीदार ठरवले गेले अाहेत. त्यामुळे थकीत कर्जावर अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड तर सहन करावा लागत अाहेच. सोबत संकटकाळी हाेणारा कर्ज पुरवठाही थांबल्याने कर्मचाऱ्याची अार्थिक कोंडी झाली अाहे. यासंदर्भात बुधवारी ग.स.च्या अधिकाऱ्यांनी प्रभारी अायुक्तांची भेट घेऊन बारा महिन्यांचा लेखाजोखा मांडला. 

ग.स.साेसायटीत जिल्हाभरातील ३५ हजारापेक्षा जास्त सरकारी कर्मचारी सभासद अाहेत. पगारातून वर्गणीची कपात तसेच मागेल तेव्हा कर्ज देणारी संस्था असल्याने शासकिय सेवेत दाखल हाेणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा अाेढा या संस्थेकडे असताे; परंतु सध्या याच संस्थेचे सभासद असलेले महापालिकेचे कर्मचारी प्रचंड तणावाखाली अाली अाहेत. ग.स.साेसायटीतून कर्ज घेतलेल्या पालिकेच्या १२०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या पगारातून बारा महिन्यांचे हप्ते कापले गेले अाहेत; परंतु त्या हप्त्यांची रक्कम मात्र ग.स.साेसायटीत जमा झाली नसल्याची वस्तुस्थिती समाेर अाली अाहे. त्यामुळे वारंवार सूचना करूनही पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांची अार्थिक काेंडी सुरू झाली असून व्याजावर दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत अाहे. 

थकबाकीदारांचे खाते लवादाकडे 
तत्कालीनअायुक्तांच्या काळात कर्जाचे हप्ते थकवल्यामुळे ग.स.साेसायटीने सभासदांची खाते वर्गणी खरेदी करून लवादाकडे पाठवले अाहेत. त्यामुळे अाता जुने देणी परत करेपर्यंत सभासदांना नवीन कर्ज देणे बंद करण्यात अाले अाहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अार्थिक अडचणींचा सामना करावा लागत अाहे. ग.स.च्या व्यवस्थापकांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी अायुक्त किशोर राजेनिंबाळकर यांची भेट घेऊन थकीत रक्कम ग.स.साेसायटीला भरण्याचे पत्र दिले. 

अशी ‌थकवली पालिकेने रक्कम 
महापालिकेच्याकर्मचाऱ्यांनी घेतलेल्या ग.स.च्या कर्जापोटी प्रशासनाने जून २०१५ ते अाॅगस्ट २०१६ या कालावधीतील कर्जाच्या हप्त्यांची रक्कम पगारातून कपात केली अाहे; परंतु हप्त्याची रक्कम ग.स.साेसायटीकडे जमा केलेली नाही. मनपा कर्मचाऱ्यांची जून २०१५ ते अाॅगस्ट २०१६ दरम्यानची काेटी ८० लाख ७९ हजार ७७५ रूपये रक्कम अाहे. तर मनपा शिक्षण मंडळातील सुमारे २५० शिक्षकांची जानेवारी २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यानची ९३ लाख ३६ हजार २९२ रूपये अशी तब्बल पावणे तीन काेटी रूपये थकवले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...