आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन संतापले, आंदोलक शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या१६ दिवसांपासून महापालिका शाळांच्या शिक्षकांचे सुरू असलेले आंदोलन वेगळ्या वळणावर गेले आहे. बुधवारी एका शिक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. शिक्षक संघटनांचे शिक्षकांवर नियंत्रण नसणे त्यांनीच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय आता व्यक्त होतोय. त्यामुळे संघटना त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपायुक्तांनी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. दरम्यान, शिक्षकांच्या वेतनाच्या विषयावर २० रोजी वशिेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या शिक्षकांनी १४ महिन्यांचे ५० टक्के वेतन मिळावे म्हणून जुलैपासून आंदोलन सुरू केले आहे. मात्र, पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वेतन अदा करणे शक्य नसल्याचे सगळ्याच पातळींवरून आंदोलकांना सांगण्यात आले. तरीदेखील हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच आता हे आंदोलन चिघळले असून, बुधवारी एका शिक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर प्रशासनाने हा विषय चांगलाच मनावर घेतला आहे. आंदोलन करणारी संघटना मान्यताप्राप्त आहे का? आंदोलनकर्त्यांनी कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे का? याची शहानशिा करण्याचे आदेश उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी दिले आहेत. तसे नसल्यास सर्व शिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शाळा बंद केल्याने समाजातील वंचित दुर्बल घटकांतील वदि्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षकांवर जबाबदारी नशि्चित करून आरटीई कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
सभेत ५०%अनुदान बंद करण्याचा ठराव रद्द करण्याबाबत चर्चा
शिक्षकांच्याआंदोलनानंतर आता २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता महापौर राखी श्यामकांत साेनवणे यांच्या अध्यक्षतेखाली वशिेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महासभेने २० ऑक्टाेबर २०१४ रोजी केलेला ५० टक्के अनुदान बंद करण्याचा ठराव रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
आता पटपडताळणीही होणार
मनपाच्या सर्व शाळांमधील पटपडताळणी करण्यासाठी वदि्यार्थ्यांची भौतिकरीत्या नावानशिी ओळख परेड घेऊन पटसंख्या नशि्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पटसंख्या नशि्चित झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. तसेच महासभेने मनपा शाळा शासनाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत. याप्रकरणी प्रशासन अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवण्यात आला असून, त्यांनी कणखर योग्य भूमिका घेतल्यामुळे हे आंदोलन या स्थितीपर्यंत आल्याचे आपल्या आदेशात उपायुक्तांनी स्पष्ट म्हटले आहे.
शिक्षकाची प्रकृती स्थिर
विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे शिक्षक डॉ.शफीक नाजीम सय्यद यांना बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतदिक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रेय बिराजदार यांनी सांगितले.
‘नगरविकास’ला अहवाल
बुधवारीच्याघटनेनंतर रात्री उशिरापर्यंत उपायुक्त गांगाेडे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी वसंत महाजन यांनी अहवाल तयार केला. त्यात मनपाची सध्याची आर्थिक स्थिती शिक्षकांच्या सुरू असलेल्या आंदोलनासह एका शिक्षकाने आत्महत्येचा केलेल्या प्रयत्नाबाबत माहिती दिली आहे. तसेच आंदोलकांना पालकमंत्र्यांसह राजकीय नेत्यांनी आयुक्तांनी गाळ्यांचा प्रश्न सुटल्यानंतर वेतनाचा प्रश्न साेडवण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही आंदोलन सुरू असल्याचे या अहवालात नमूद केले असून, हा अहवाल नगरविकास शिक्षण खात्याला देण्यात येणार आहे.
शिस्तभंगाचा दिला इशारा
उपायुक्तांनी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी वसंत महाजन यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. महापालिका शिक्षण मंडळाचा भार उचलण्यास असमर्थ असल्याने महाराष्ट्र शासनाने शिक्षण मंडळाच्या खर्चाची रक्कम महापालिकेला अनुदान स्वरूपात द्यावी किंवा संपूर्ण शिक्षण मंडळ प्रशासन स्वत:च्या अखत्यारीत घ्यावे, असा निर्णयही घेतला. परंतु, यासंदर्भात प्रशासन अधिकारी महाजन यांनी शासनाशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही आंदोलनाबाबतही काही अहवाल दिला नाही. त्यामुळे त्यांना याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...