आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधीक्षकांनी अखेर काढले अतिक्रमण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच. एम. खान यांच्याविराेधात अतिक्रमण केल्याच्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. तर नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्यानुसार खान यांनी त्यांच्या घराच्या परिसरातील शाैचालय पत्र्याचे शेड असलेले अतिक्रमण स्वत: काढून घेतले. मेहरूण परिसरातील अक्सानगर येथील सिटी सर्व्हे नंबर १६मधील प्लाॅट नंबर ९२ मध्ये राहणारे महापालिकेचे अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांनीच स्वत:च्या घराजवळ सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचे प्रकरण १५ दिवसांपासून गाजत हाेते. 
 
त्या ठिकाणी त्यांनी पत्र्याच्या तीन-चार खोल्या बांधून त्या भाड्याने दिल्याचे तसेच अब्दुल रहिम गफूर खाटीक, मुमताजबी सलीम शेख, मोहम्मद इक्बाल यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार परिसरातील शेख सलीम, शेख शफी, शेख सईद शेख शाहीद या नागरिकांनी सन २०१२पासून महापालिकेकडे केली आहे. तक्रार केल्यापासून पाच वर्षे उलटल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांनी थेट नगररचना विभागाच्या प्रवेशद्वारासमाेर अांदाेलन सुरू केले हाेते. त्यानंतर नगररचना विभागाचे अभियंता विजय मराठे यांनी अहवाल तयार करून शेड शाैचालयाचे अतिक्रमण असल्याचे कळवले हाेते. त्यानुसार अतिक्रमण अधीक्षक खान यांनी बाय १८ फूट अाकाराचे पत्र्याचे पार्टिशनच्या शेडचे अतिक्रमण काढून टाकले अाहे. तसेच घराबाहेरील शाैचालयही त्यांनी पाडले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...