आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळे लिलावातून पालिकेला मिळणार सुमारे ४०० काेटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्पन्नाचे प्रमुख स्त्राेत असलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांप्रकरणी अाैरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिल्याने महापालिका पुन्हा एकदा ऊर्जितावस्थेत अाली अाहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार गाळे ताब्यात घेऊन लिलाव करावा लागणार अाहे. त्यातून पालिकेच्या तिजाेरीत तब्बल ४०० काेटींच्या अासपास रक्कम जमा हाेणार अाहे. त्यामुळे हुडकाे कर्जासह शहरातील वर्षानुवर्ष रखडलेल्या विकास कामांचा मुहूर्त साधता येणे शक्य हाेणार अाहे. 
तत्कालीन नगरपालिकेने हुडकाेकडून १४१ काेटींचे कर्ज घेतले हाेते. त्या कर्जाच्या परतफेडीत अालेल्या अडचणीनंतर अाता कर्जाचा अाकडा तब्बल ४४६ काेटींवर पाेहचला अाहे. एवढी माेठी रक्कम फेडणे पालिकेला कदापि शक्य नसल्याने अाधीच वाकलेली महापालिकेचे कंबरडे माेडण्याची भीती व्यक्त हाेत अाहे. त्यात १८ व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या २१७५ गाळ्यांसंदर्भात खंडपीठाने दिलेला निर्णय पालिकेला सक्षम हाेण्यासाठी उपयुक्त ठरणार अाहे. महापालिकेच्या २१७५ गाळ्यांची मुदत मार्च २०१२ मध्ये संपल्यानंतर गाळेधारकांनी पालिकेला अाजपर्यंत एक रुपयाही भाडे दिले नसल्याने पालिकेचा माेठा पैसा गाळेधारकांकडे अडकला अाहे. पालिकेला भाडेपाेटी वर्षाला सुमारे दीड काेटींचा महसूल मिळत हाेता. त्यात दर वर्षाच्या रेडी रेकनरनुसार वाढ अपेक्षित हाेती; परंतु पाच वर्षापासून पालिकेचे गाळेधारकांकडे भाडेपाेटी सुमारे ते काेटी रुपये अडकले अाहेत. गाळेधारकांनी भाडे दिल्याने ठराव क्रमांक ४० नुसार पाचपट दंडाचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार पालिकेचे पाच वर्षांचे तब्बल १५० काेटी रुपये गाळेधारकांकडे घेणे अाहेत. ही रक्कम गाळेधारकांकडून वसूल केली जाईल अन्यथा त्यांच्या मालमत्तेवर बाेजा चढवण्याची कार्यवाही देखील हाेऊ शकते. दरम्यान, गाळे ताब्यात घेतल्यानंतर जाहीर लिलावातून पालिकेच्या तिजाेरीत सुमारे ४०० काेटी रुपये जमा हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त हाेत अाहे. 

गाळेधारक अाव्हान देण्याची शक्यता 
अाैरंगाबाद खंडपीठाचा निर्णय गाळेधारकांसाठी धक्कादायक मानला जात अाहे. त्यामुळे खंडपीठाच्या निर्णयाविराेधात गाळेधारक सर्वाेच्च न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेनेही सर्वाेच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली. 

विकासाचा मार्ग माेकळा हाेईल 
शहरातील काेणत्याही विकास कामाचा विषय अाला की पालिकेची अार्थिक परिस्थितीचा मुद्दा पुढे केला जाताे. कर्जाची फेड वेळीच केल्याने मनपावरील कर्जाचा बाेजा वाढत गेला अाहे. अाता ते फेडताना नाकेनऊ येत अाहे. त्यामुळे शहरात १५ वर्षांत एकही ठाेस विकासाचे काम हाेऊ शकलेे नाही. रस्ते, गटारींची समस्या कायम अाहे. साफसफाई नियमित पाण्याचा प्रश्न कायम अाहे. गाळ्यांच्या माध्यमातून चालना मिळाल्यास शहरात पुन्हा विकासाची गंगा वाहील, असा विश्वासही व्यक्त हाेत अाहे. मूलभूत सुविधांसाेबत ठाेस कामांसाठी हाती पैसा अाल्यास जनहिताचे प्रकल्पही हाती घेणे शक्य होईल. केंद्र राज्याच्या माध्यमातून मंजूर हाेणाऱ्या विकासकामांसाठी मनपाचा हिस्सा भरणे साेपे जाईल. 

गाळेधारकांमध्ये संभ्रम 
अाैरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयासंदर्भात उलटसुलट माहिती येत असल्याने जाे ताे अापापल्या पद्धतीने अर्थ लावत हाेता. गाळेधारकांमध्ये १४ मार्केटचा निर्णय वेगवेगळा असल्याचे सांगितले जात हाेते. दरम्यान, दुपारी १८ मार्केटमधील गाळे ताब्यात घेण्याचा निकालाची वार्ता येताच फुले मार्केटमधील गाळेधारकांमध्ये जाेरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी महापालिकेत तसेच वृत्तपत्रांच्या कार्यालयात विचारणा सुरू केली. 
बातम्या आणखी आहेत...