आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगावला तलवार हल्ल्यातील जखमीचा मृत्यू; पाेलिस ठाण्यासमाेर नातेवाईकांचा ठिय्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - पूर्ववैमस्यातून झालेल्या तलवार हल्ल्यातील गंभीर जखमी झालेले मुन्ना शाह गुलाब शाह (वय ५०) यांचा मृत्यू झाला. खून प्रकरणातील अाराेपींना अटक करावी या मागणीसाठी मृताच्या संतप्त नातेवाईकांनी शनिवारी सकाळी पाेलिस स्टेशनसमाेर रास्ता राेकाे अांदाेलन केले. या प्रकाराने अनिल नगर पाेलिस स्टेशन परिसरात तणाव पसरला. 
 
शुक्रवारी दुपारी दाेेन गटात हाणामारी झाली. मुन्ना शाह गुलाब शाह यांच्यावर तलवार काेयताने सपासप वार करण्यात अाले. त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना तातडीने धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत अश्फाक शाह (वय २५), वसीम सय्यद मुन्ना शाह गुलाब शाह हे तिघेही जखमी झाले हाेते. शहरातील हंस टाॅकीनजीक असलेल्या अनिल नगरातील मिर्झा शाह कुटुंबात वाद झाला. रेल्वे स्टेशनजवळील मशिदीत अश्फाक शहा हा दुपारी वाजता नमाज पडण्यासाठी जात हाेता. वसीम सय्यद याकूब याच्याशी त्याचा वाद झाला. दाेघा गटाचे साथीदार तेथे जमा झाले, तेथूनच वादाला सुरूवात झाली हाेती. मृत मुन्ना शाह गुलाब शाह यांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी पाेलिस स्टेशनसमाेर शनिवारी सकाळी १० वाजता रस्ता अडविला. ५०० ते ७०० जणांचा जमाव पांगवण्यासाठी पाेलिसांना नाकीनऊ अाले. पाेलिसांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार घडल्याचे मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकरणी १० ते १२ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

अनिलनगरात तणाव : याघटनेने अनिल नगरात सकाळी वाजेपासून प्रचंड तणाव हाेता. कर्फ्यूसदृष्य परिस्थिती हाेती. रॅपीड अॅक्शन फाेर्स, दंगा नियंत्रण पथक, भडगाव, पाचाेेरा, मेहुणबारे तसेच स्थानिक चाळीसगाव पाेलिस स्टेशनचे पाेेलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले हाेेते. या भागातील संपूर्ण व्यवहार ठप्प हाेते. 

पाेलिसांबद्दलतीव्र राेेष 
मुन्नाशाह गुलाब शाह यांचा मृतदेह घेऊन येणारी शववाहिका घरी पाेेहाेचल्यावर त्यांच्या पत्नी तसेच मुलांनी पाेलिसांविषयी संताप व्यक्त केला. मशिदीजवळील हाणामारीच्या घटनेबाबत पाेलिसांना सांगण्यात आले होते; पण पाेलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही, अशी तक्रार मृताच्या कुटुंबीयांची आहे. 

पाेलिस अधिकारी हजर : चाळीसगावशहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अादिनाथ बुधवंत उपविभागीय पाेलिस अधिकारी अरविंद पाटील हे दाेघे दाेन ते तीन दिवस शहरात नसतानाच हाणामारीची घटना घडली होती. त्यामुळे पाचाेरा येथील उपविभागीय पाेलिस अधिकारी केशव पाताेंड पोहोचले. अप्पर पाेलिसअधीक्षक बच्छाव, ग्रामीण पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड उपस्थित हाेते. 
 
पाेलिसांची तीन पथके रवाना 
खून प्रकरणातील अाराेपींना शाेधण्यासाठी पाेलिसांची तीन पथके मालेगाव, मुंबई तसेच मनमाडकडे रवाना करण्यात अाली. मालेगावात जाऊन पथकाने एकास ताब्यात घेतल्याची चर्चा पाेलिस वर्तुळात हाेती. अप्पर पाेेलिस अधीक्षक बच्छाव यांनी या घटनेबाबतची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षकांना दिली. 

दाेघांना अटक; तिघांची चाैकशी 
पाेलिसांनी इम्तीयाज हुसेन बेग मिर्झा वसीम सय्यद याकूब सय्यद यांना अटक केली. तसेच इतर तीन जण चौकशीसाठी ताब्यात घेतले. फरार असलेल्या संशयित अाराेपींच्या कुटुंबीयांना पाेलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी अाणण्यात अाले. सर्व अाराेपी लवकरच जेरबंद हाेतील, असे प्रभारी पाेलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले. 

आंदोलनामुळे वाहतूक ठप्प 
याघटनेत मुन्ना शाह गुलाब शाह यांचा मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले. जवळपास ५०० ते ७०० महिला पुरुषांचा जमाव पाेलिस ठाण्यासमाेर जमा झाला. त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करीत रास्ता राेकाे अांदाेलन केले. त्यामुळे दाेन्ही बाजूची वाहतूक बराच वेळ ठप्प झाली हाेती. 

बंदाेबस्तात अंत्ययात्रा 
मृतदेहघरी पाेहाेचण्यापूर्वीच अनिलनगरात तगडा बंदाेबस्त लावण्यात अाला हाेता. दुपारी १.३० वाजता धुळे येथे मृतदेह घेऊन येणारी शववाहिका आली तेव्हा या रुग्णवाहिकेच्या मागे पुढे पाेलिसांची वाहने हाेेती. तेव्हा या भागात प्रचंड तणाव झाला. मयताचे कुटुंबीय नातेवाइकांनी आक्रोश केला. अाराेपींना अटक केल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका मयताच्या नातेवाइकांनी घेतली; परंतु त्यांची समजूत काढली. 

 
बातम्या आणखी आहेत...