आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्याजवळील दराेड्यात 1 ठार, दाेघांना 15 तासांत अटक; चाळीसगावातही केली हाेती लूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्माईल बाबू - Divya Marathi
इस्माईल बाबू
धुळे, मुक्ताईनगर - धुळ्याजवळील अजंग गावाच्या शिवारात असलेल्या काेयल पेट्राेल पंपावर रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चड्डी-बनियनवर अालेल्या तिघांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत दराेडा टाकला. या वेळी दराेडेखाेरांनी केलेल्या हल्ल्यात पेट्राेल पंपात झाेपलेला जेसीबी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य तिघे कर्मचारी जखमी झाले.
 
या घटनेतील दाेन अाराेपींना अवघ्या पंधरा तासात पाेलिसांनी पकडले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरातील मधापुरी गावातून दाेघांना ताब्यात घेतले. तिसऱ्याचा शोध सुरू अाहे. धुळे तालुक्यातील फागणे ते अजंग गावादरम्यान नागपूर-सुरत महामार्गावर काेयल पेट्राेल पंप अाहे. हा पंप २४ तास सुरू असताे. या ठिकाणी रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मॅनेजर प्रकाश बुधा पाटील (वय ३३), जगदीश सतीश सूर्यवंशी (वय २०, दाेघे रा.फागणे) अाणि दीपक सुकदेव पाटील (वय ३५, रा. देवभाने) हे तिघे टीव्ही पाहत बसले हाेते. त्या वेळी तीन जण चड्डी-बनियनवर ताेंडाला फडके बांधून पेट्राेल पंपाजवळ आल्याचे दिसले. या वेळी शेजारच्या खाेलीबाहेर झाेपलेलेे इस्माईल बाबूभाई उर्फ सय्यद (वय ७४, निफाड, जि. नाशिक) यांनाही जाग अाली. ते काय झाले हे पाहण्यासाठी उठून येत होते. त्या वेळी दराेडेखाेरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे ते अाेट्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
 
दराेडेखाेरांनी पंपाच्या कार्यालयात प्रवेश करीत कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. त्यामुळे प्रकाश पाटील यांनी पैसे काढून दिले. त्यानंतर दराेडेखाेरांनी त्यांच्या हातात असलेले चांदीचे एक हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट अाणि तीन हजार रुपयांचा माेबाइल हिसकावून घेतला. तसेच इतर दाेघांनाही दरोडेखोरांनी काठीने मारहाण केली. 
 
पाराेळ्यातील लुटीतही सहभाग 
पारोळा :
तालुक्यातील आर्वी रस्त्यावर १२ जुलै राेजी झाड आडवे लावून वाहनांना लुटणारे अाराेपी अजंग दराेड्यातील अाहेत. अाराेपींनी राेख रक्कम लॅपटाॅप लुटला हाेता. त्यांना पारोळा पोलिस स्टेशनला आणले असता यातील साक्षीदार फिर्यादी यांनी अाेळखले. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पारोळा पाेलिस स्टेशनला रात्री भेट देऊन माहिती घेतली. 
 
चाळीसगावातही केली हाेती लूट 
घटनेनंतर दरोडेखोरांच्या वर्णनावरून पाेलिसांनी जळगाव जिल्ह्यातील पोलिसांशी संपर्क साधला. त्यातून चाळीसगाव येथेही दाेन ते तीन दिवसांपूर्वी अशा पध्दतीने पेट्रोलपंपावर लूट झाल्याचा प्रकार उघडकीस अाला हाेता. या घटनेची व्हिडीअाे क्लिप पाेलिसांनी मागविली. त्यातील संशयिताचे वर्णन काेयल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सांगितलेली माहिती सारखीच असल्याने तेच सूत्रधार असल्याची खात्री पटली. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, दाेघांना मुक्ताईनगरात पकडले...