आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीच्या बहाण्याने मित्रांकडून सलमानची हत्या, बहिणीची छेड काढल्यावरून भांडणचा काढला वचपा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान पटेल - Divya Marathi
सलमान पटेल
जळगाव - बहिणीची छेड काढल्यामुळे वर्षभरापूर्वी झालेल्या वादातून सलमान पटेलची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी समोर आली. कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केली. 
 
तांबापुरा येथील सलमान पटेल या तरूणाचा मेहरूण तलावावर पार्टीचा बहाणा करून घेवून जाणाऱ्या दोघा मित्रांनीच त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. मुजफ्फर शेख कमल अयाज उस्मान मणियार असे संशयितांची नावे आहेत. दोघे जण सलमानच्या घरसमोरच राहत असून मुजफ्फर याने गेल्या वर्षी सलमानच्या बहिणीची छेड काढली होती. त्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी मुजफ्फरने सलमानला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. याच जुन्या भांडणातून मुजफ्फर अयाज मणियार यांनी सलमानचा खून केला आहे असा संशय व्यक्त करीत पोलिसांनी दोघांना अटक केली. २५ मे २०१७ रोजी सलमानचा विवाह होणार होता. विवाहाच्या चार दिवस आधी म्हणजेच २१ रोजी मुजफ्फर अयाज यांनी लग्नाची पार्टी दे म्हणत त्याला मेहरूण तलावावर घेवून गेले. यानंतर सलमानला पाण्यात फेकून देत दोघांनी पोबारा केला. असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सलमान बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. पण तो सापडला नव्हता. दुसऱ्या दिवशी मेहरूण तलावात त्याचा मृतदेह आढळुन आला होता. त्याच दिवशी सलमानच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. अखेर मंगळवारी पोलिसांनी मुजफ्फर अयाज यांना संशयावरून ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात हजर केले असता ११ अॉगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
 
घटनेच्या रात्री दोघेही सलमान सोबतच 
घटना घडली त्या रात्री मुजफ्फर अयाज हे दोघे सलमान सोबत मेहरूण तलाव परिसरात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना अाधीच मिळाले होते. त्यानुसार दोघांची चौकशी देखील करण्यात आली होती. परंतु ठोस माहिती त्यांनी पोलिसांना दिली नव्हती. सलमानने आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. त्यानुसार सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता सलमानचे वडील बाबू पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
कुटुंबीयांनी केले उपोषण 
सुमारे अडीच महिन्यांपूर्वी सलमानचा मृत्यू झाला आहे. त्याच्या सोबत घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी आधीच व्यक्त केला होता. न्याय मिळावा या मागणीसाठी कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण केले होते. पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन मारेकऱ्यांना शोधण्याची विनंती केली होती. अखेर या प्रकरणात आता दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून घटनेची खरी माहिती समोर येणार आहे.  
बातम्या आणखी आहेत...