आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संगीत संशेवकल्लाेळ’मध्ये ३० स्थानिक कलावंतांचा समावेश, खान्देशातील लहेजाचे हे नाटक सर्वदूर पाेहाेचवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - स्थानिक कलावंतांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि नाट्यचळवळ अधिक वृद्धिंगत हाेण्यासाठी खास खान्देशी लहेजा असणारे जळगावातील पहिले वहिले ‘संगीत संशेवकल्लाेळ’ नाट्यप्रयाेग प्रेक्षकांच्या मनाेरंजनासाठी निर्मिती करण्यात येत अाहे.
 
स्व.वसंतराव चांदाेरकर स्मृती प्रतिष्ठान श्री महालक्ष्मी प्राॅडक्शन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही नाट्यनिर्मिती करण्यात येत अाहे. गुरुवारी या नाटकाचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात अाला. सुुरुवातीला जुईली कलभंडे हिने गुरुवंदना सादर केली. 
 
अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका निशा जैन अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बँक अाॅफ महाराष्ट्राचे सहायक महाव्यवस्थापक अविनाश कणीकर, महालक्ष्मी प्राॅडक्शनचे राजेंद्र पाटणकर, प्रतिष्ठानचे दीपक चांदाेरकर, शरदचंद्र छापेकर, अरविंद देशपांडे, दीपिका चांदाेरकर तसेच या वेळी ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक त्र्यंबक कापडे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी, हेमंत अलोने, धों.ज.गुरव उपस्थित हाेते. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक हेमंत कुलकर्णी यांनी नाटकाचे दिग्दर्शन लेखन केले अाहे. 
 
या नाटकासाठी आयोजित केलेल्या निवड चाचणीत १२० जणांनी सहभाग नाेंदवला. यातून ३० कलावंतांची निवड करण्यात अाली अाहे. निवड झालेला कलावंत विशाल जाधव म्हणाला, नाटकाचे शिक्षण, प्रशिक्षण कधी घेतले नाही. परंतु अामची घाेडदाैड सुरू हाेती. याेग्य मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे नव्याने अाम्ही शिकलाे असून खूप माेठी संधी मिळाली आहे. निशा जैन म्हणाल्या, अानंदाने कसे जगावे हे कला शिकवत असते.
 
अनेकांना वेगवेगळ्या कलाक्षेत्रात अावड असते. परंतु यात करिअर करता येत नाही. त्यामुळे या नाटकामुळे करिअर करण्याची संधी मिळाली अाहे. तर हेमंत कुलकर्णी म्हणाले, हे नाटकातून प्रत्येकाला निखळ मनाेरंजन मिळेल. हव्या त्या जागेत, हव्या त्या साहित्यात करता येणारे नाटक अाहे, असेही ते म्हणाले. राजेंद्र पाटणकर म्हणाले, मुंबई पुण्यात अनेक प्रतिभासंपन्न कलावंत अाहेत. 
 
अापल्या कलेद्वारे उत्तम नावारुपास अाले अाहेत. मात्र, यातील अनेक कलावंत हे बाहेरील भागातून आले अाहे. त्यामुळे मुंबई बाहेर चांगले कलावंत असतील तर त्यांनी मुंबईत येण्याची वाट पाहण्यापेक्षा अापणच त्यांच्याकडे जावे, या उद्देशाने हे नाटक तयार करण्यात अाले.
 
तसेच नाटक हे प्रमाण भाषेतच सादर व्हावे, असे नसते. प्रत्येक प्रदेशाचा एक लहेजा वेगळा असताे अाणि नाटक हे कलाकार प्रेक्षकांचा संवाद असताे. त्याला काेणत्याही भाषेचा भेद नसताे तर ते अभिनयातून पाेहोचते. म्हणूनच खान्देशातील लहेजाचे हे नाटक सर्वदूर पाेहोचवण्यासाठी हे नाटक तयार हाेत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...