आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिका रुग्णालयात उष्माघात कक्ष केवळ नावालाच, सोयी-सुविधांचा अभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उष्माघात कक्षातील कूलर वापराविना पडून आहे. तसेच कक्षातील पलंगांवर गादी नसल्याची स्थिती आहे. - Divya Marathi
उष्माघात कक्षातील कूलर वापराविना पडून आहे. तसेच कक्षातील पलंगांवर गादी नसल्याची स्थिती आहे.
भुसावळ- पालिका रुग्णालयातील उष्माघातकक्षाबाबत दरवर्षी केवळ औपचारिकता पूर्ण केली जाते. गेल्यावर्षी उष्माघात कक्षात कुलर नसल्याने तो बंद होता. यंदा सामाजिक विचारमंचने कुलर भेट देवूनही उष्माघात कक्ष सज्ज झालेला नाही. पालिका रुग्णालयातील पुरुष रुग्ण कक्षाला ‘उष्माघात कक्ष’ असा फलक लावून पालिकेने नामधारी उष्माघात कक्ष सुरु केला आहे. यामुळे जिल्ह्यात हॉट सिटी म्हणून परिचित असलेल्या शहरातील नागरिक सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहेत. 
 
जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये भुसावळचा समावेश होतो. शहरात असंघटीत कामगारांचे प्रमाणही अधिक आहे. तसेच शहरात ग्रामीण रुग्णालय किंवा अन्य शासकिय रुग्णालय नसल्याने गोरगरिबांना किंवा कामगारांना पालिका रुग्णालया शिवाय पर्याय नाही. मात्र सध्या पालिकेचे रुग्णालय वाऱ्यावर आहे. शहरात उष्माघाताच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असतानाही पालिका रुग्णालयात सुविधा मिळत नाही. 
 
निव्वळ दिखाव्यावर भर 
पालिका रुग्णालयात सध्या रुग्णसेवेऐवजी कागदोपत्रीच कामे रंगवली जात आहेत. सर्वेक्षण करताच अहवाल सादर करणे, रुग्णसेवेपेक्षा प्रझेंटेशनवरच अधिक भर दिला जातो. नुकतीच पालिकेच्या रुग्ण कल्याण समितीची बैठक झाली. यात मंजूर झालेल्या किती विषयांना गती मिळाली? याची माहिती मात्र पालिकेतील सत्ताधारी किंवा अधिकारीही घेतात किंवा नाही याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.मुख्याधिकाऱ्यांनी पाहणी करणे गरजेचे आहे. 
 
अधिकाऱ्यांना सूचना देऊ 
-रुग्णालयात औषधांचा साठा कायम ठेवणे, नवीन औषधांची खरेदी करणे आदींवर ठराव झाले आहेत. उन्हाळ्यात सरप्राइज व्हिजीट देऊन उष्माघात कक्षाची पाहणी केली जाईल. तसेच यासंदर्भात रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही सूचना देऊ. रमण भोळे, नगराध्यक्ष 
 
बातम्या आणखी आहेत...