आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नकाणे तलाव निम्म्याहून अधिक भरल्याने टंचाईचे संकट टळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अक्कलपाडा प्रकल्पातील वाया जाणाऱ्या पाण्यातून अद्यापही हरणमाळ त्यातून नकाणे तलाव भरून घेतला जात अाहे. त्यामुळे अल्प पाऊस हाेऊनही नकाणेत २५०पेक्षा जास्त एमसीएफटी साठा झाला आहे. हरणमाळ तलावातील पाणी निरंतर नकाणे तलावात येत अाहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाई जाणवणार नाही.
शहर परिसरात यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने नकाणे हरणमाळ तलाव निम्माही भरला नव्हता. मात्र अक्कलपाडा धरण भरून ओसंडून वाहत होते. त्यामुळे त्या पाण्याच्या माध्यमातून हरणमाळ तलाव भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले. अक्कलपाडा धरणाच्या कालव्याद्वारे हरणमाळ तलाव भरण्यास काही दिवसांपासून सुरुवात झाली अाहे. या तलावात दररोज चार ते पाच एमसीएफटी पाणी येत आहे. तलाव भरण्याच्या प्रक्रियेला महिना, दीड महिन्याचा कालावधी झालेला आहे. तसेच हरणमाळ तलावातून नकाणे तलावात पाणी भरण्यास सुुरुवात झाली आहे. नकाणे तलावाची क्षमता ३६० एमसीएफटी अाहे. सप्टेंबर महिन्यात नकाणे तलावात साधारणपणे शंभर एमसीएफटी पाणीसाठा होता; परंतु आता नकाणे तलावात २५०पेक्षा जास्त एमसीएफटी पाणीसाठा झाला आहे. हरणमाळ तलावात ७७ एमसीएफटी पाणीसाठा आहे. हरणमाळ तलावातून निरंतरपणे नकाणे तलावात पाणी भरणे सुरू आहे. डिसंेबरच्या मध्यापर्यंत तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच
नकाणे तलाव परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परिसरात वनराई बहरली आहे. परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने नकाणे तलावाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात अाले आहेत. काही दिवसांपूर्वी येथील वृक्षांना आग लागण्याचीही घटना घडली हाेती.

नकाणेत वलवाडीसाठी पाणी केले आरक्षित
नकाणे तलावातील पाणीसाठा मनपाने पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केला होता. त्याची पाणीपट्टी महापालिका प्रशासन भरते. त्याप्रमाणे आता वलवाडी ग्रामपंचायतीचाही ६७ एमसीएफटी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. नकाणे तलावातून वलवाडी पाणी शुद्धीकरण केंद्रावर पाणीपुरवठा होत आहे.

तलावाजवळ रॅम्पचे काम जवळपास पूर्ण
नकाणे तलावाच्या बांधाजवळ पाणी सोडण्यासाठी गेट आहे. हे गेट नादुरुस्त झाले होते. हे काम पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले. या ठिकाणी बांधापासून एक रॅम्प बांधण्यात आला आहे. तसेच बांंधाच्या पिचिंगचे कामही करण्यात अाले आहे. गेट दुरुस्तीमुळे पाण्याचा होणारा अपव्ययही टळला आहे.
बातम्या आणखी आहेत...