आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या ८२व्या वर्षीही तंटामुक्तीसाठी प्रयत्न; युवा वर्गाला मार्गदर्शन, पक्ष कार्यासह सामजिक कार्यात सक्रिय सहभाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्रियाशील सदस्य, भाजपच्या स्थापनेपासून पक्षाचे संघटनात्मक कार्य आणि त्यानंतर तब्बल २२ वर्ष जिल्हा परिषद सदस्यपदाची गौरवपूर्ण कारकीर्द. यासोबतच तळवेल (ता. भुसावळ) ग्रामपंचायतीचे १७ वर्ष बिनविरोध सरपंचपद अशी दैदिप्यमान राजकीय वाटचाल करणारे नारायण पाटील वयाच्या ८२व्या वर्षीदेखील गावाच्या तंटामुक्तीसाठी प्रयत्नशील आहेत. तालुक्यातील भाजपची मिरर इमेज म्हणून ते ओळखले जातात. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदावरुन गावातील तंटे गावातच सोडविणे, शेती शिवाराची देखभाल करणे असा नित्यक्रम त्यांनी सुरु ठेवला आहे. 
 
तारुण्यात पोलिस दलात नोकरीत असलेल्या नारायण पाटील यांना वडीलांच्या निधनानंतर शेतीबाडीसाठी नोकरी सोडून गावात परतावे लागले. पिक सरंक्षण सोसायटीचा कारभार त्यांनी हाती घेतला. याच काळात तळवेलचे सरपंच आणि त्यानंतर तब्बल २२ वर्ष जिल्हा परिषद सदस्य पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. कोणत्याही प्रमुख पदाची अपेक्षा ठेवता राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक कामांवर त्यांचा भर होता. वयाच्या ८२ व्या वर्षी राजकिय पदांपासून दूर असले तरी दररोज सकाळी शेतीशिवारात फटका, पिकांसह फळबागांची पाहणी, कांदा बिजोत्पादनावर विशेष लक्ष आणि सायंकाळी गावातील तंटे गावातच सोडवण्यासाठीची ओसरीवरील बैठक हा त्यांचा नित्यक्रम आहे. गावातील पिक संरक्षण सोसायटी आणि दूध उत्पादक संस्था अविरतपणे चालावी, यासाठी ते दररोज दोन्ही संस्थांना भेट देतात. 

दोन्ही मुलांचा समाजकार्यात हातभार 
पाटीलयांनी कुटुंबाला सक्रिय राजकारणापासून दूरच ठेवले. त्यांचे थोरले सुपुत्र अशोक पाटील जिल्हा बँकेच्या कठोरा शाखेत नोकरीला आहेत, तर लहान चिरंजीव रवी पाटील हे दीपनगर केंद्रात कंत्राटदार आहेत. तसेच त्यांच्याकडे भाजयुमो तालुकाध्यक्षपदाची संघटनात्मक जबाबदारी आहे. 

अनेक कौटुंबिक कलहांवर काढला तोडगा 
लेवा पाटीदार समाजाची सर्वोच्च संस्था असलेल्या भोरगाव लेवा पंचायतमध्ये नारायण पाटील ज्येष्ठ न्यायपंच म्हणून सध्या कार्यरत आहेत. या पंचायतीच्या माध्यमातून अनेक कौटुंबिक कलह त्यांनी मिटवले आहेत. विखुरण्याच्या स्थितीत असलेल्या अनेक संसारांची घडी त्यांनी आजवर बसवली आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...