आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात संरक्षण, हवाई उत्पादन निर्मितीत गुंतवणुकीचा मार्ग खुला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकमध्ये संरक्षण अाणि हवाई उत्पादन निर्मिती क्षेत्रात गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला अाहे. विशेष म्हणजे, हिंदुस्तान एराेनॉटिकल लिमिटेड (एचएएल)च्या माध्यमातून माेठी गुंतवणूक येईल त्याचा फायदा येथील सूक्ष्म, लघु मध्यम उद्याेगांना हाेऊ शकणार अाहे. ज्यामुळे राेजगार निर्मितीही माेठ्या प्रमाणावर हाेणार अाहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनीही याबाबत सकारात्मक संकेत दिले अाहेत. अशी गुंतवणूक अाल्यास नाशिकच्या थांबलेल्या विकासाला चालना मिळेल, अशी अाशा स्थानिक उद्याेजकांनी व्यक्त केली अाहे.
 
संरक्षण अाणि हवाई उत्पादन निर्मिती क्षेत्रातील गुंतवणूक राज्यात वाढावी यासाठी महाराष्ट्राने स्वतंत्र धाेरण तयार केले असून, अशाप्रकारचे धाेरण तयार करणारे हे पहिलेच राज्य ठरले अाहे. ३३ हजार काेटींची गुंतवणूक अाणि एक लाखावर राेजगार निर्मितीचे उद्दिष्ट यातून ठेवण्यात अाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले अाहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षणमंत्री मनाेहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबईत एक परिषद झाली. यामध्ये या क्षेत्रातील विदेशी स्वदेशी कंपन्या सहभागी होत्या. ज्यात राज्याचे हे धाेरण मांडण्यात अाले, त्याचे कंपन्यांनी स्वागत केले अाहे.
 
उद्याेगांसाठी तयार केलेले चांगले धाेरण, चांगली कायदा सुव्यवस्थेची स्थिती, उपलब्ध पायाभूत सुविधा, दळणवळणाचे जाळे अाणि जागेची कुशल मनुष्यबळाची उपलब्धता यामुळे महाराष्ट्राचा विचार गुंतवणुकीसाठी या कंपन्या प्राधान्याने करीत असतात, याकडे संरक्षणमंत्री मनाेहर पर्रीकर यांनी यावेळी लक्ष वेधले. 
 
२५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात 
-संरक्षण क्षेत्रातील २५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र ११ आयुध निर्माणी आहेत. पुणे, नगर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर येथे संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीस वाव आहे. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 
 
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी.... 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...