आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाराेळा: तरसाेद ते फागणे 87 किलाेमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी 11 काेटींचा निधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी करताना खासदार ए.टी. पाटील साेबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी. - Divya Marathi
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी करताना खासदार ए.टी. पाटील साेबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी.
पाराेळा -  तरसाेदते फागणे या ८७ किलाेमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी १० काेटी ८४ लाखांचा निधी मंजूर झाला अाहे. येत्या दाेन दिवसांत निविदा निघतील, अशी माहिती खासदार ए.टी. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, अरविंद गंडी यांनी येथे दिली. 
 
पाराेळ्यात राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करून शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तरसाेद ते फागणे या बायपास रस्त्याच्या कामाला मार्चच्या पहिल्या अाठवड्यात सुरुवात हाेईल. यासाठी शासनाने ९५० काेटींची तरतूद केली अाहेे. बीअाेटी तत्त्वावर हे काम हाेईल. सुमारे ९१० दिवसांत काम पूर्ण करण्यात येईल. जळगाव शहरात कालिकामाता मंदिराजवळ उड्डाणपूल, समांतर रस्ता, गिरणेचा नवीन पूल, अाकाशवाणी चाैक ते शासकीय तंंत्रनिकेतन दरम्यान उड्डाणपूल, भुयारी मार्ग हाेईल. जळगाव बायपास १५.५, वरणगाव बायपास चारपदरी ३.६ किलाेमीटर अंतराचा मुकटी बायपास २.९, पारोळा बायपास रस्ता ४.९ किलाेमीटर अंतराचा राहील. हा बायपास चारपदरी असून तो भविष्यात सहा पदरी हाेऊ शकताे. त्यासाठी ६० मीटर जागा सोडली जात आहे. या कामासाठी भूसंपादनाची प्रकिया ९४ टक्के पूर्ण झाली अाहेे. बायपासचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम किंवा संबंधित नगरपालिकांकडे मेंटेनन्ससाठी हस्तांतरीत केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी येथे दिली. 

अधिकाऱ्यांना दाखवले खड्डे 
खासदारए.टी. पाटील यांनी या महामार्गावरील खड्डे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या प्रमुख अधिकाऱ्यांना अावर्जून दाखवले. विचखेडा, कडजी रस्त्यावरील खड्डे पाहून ते अवाक‌् झाले. भाजप शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, संजय गांधी योजनेचे रवींद्र पाटील, विचखेडा येथील अमोल पाटील, अमोल जाधव उपस्थित होते. 

जुन्या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती लवकरच हाेणार 
खासदाररक्षा खडसे यांच्यासह मी स्वत: बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा विषय सन २०१४ पासून लावून धरला होता. त्यानुसार अंदाजपत्रकात शासनाने जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १० काेटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला अाहे. निविदा येत्या दोन दिवसांत निघणार अाहे. पारोळा तालुक्यातील विचखेडा, कडजी, मोंढाळे, सार्वे ह्या भागातील रस्त्यावरील खड्डे त्वरित भरले जातील. तरसोद ते फागणे या ८७ किमीच्या रस्त्यातील खराब साइडपट्ट्यांची दुरुस्ती करणे, वळणावरील काटेरी झुडपे कापणे, दिशादर्शक बोर्ड लावणे, रस्ते मार्किंग करणे ही कामे हाेतील, असे खासदार पाटील यांनी येथे नमूद केले. 

चिखलीते तरसोद रस्त्याचे कामही मार्गी लागणार 
प्रकल्पसंचालक अरविंद काळे म्हणाले की, चिखली ते तरसोद या ६३ किमी अंतराच्या बायपास रस्त्यासाठी ९४८ कोटी रुपयांची तरतूद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे. हे काम देखील मार्चमध्ये सुरू होऊन ते ९१० दिवसांत पूर्ण हाेईल. ज्या शेतकऱ्यांना जमिनीचे पोट हिस्से, फळबागांबाबत नवीन मूल्यांकन, गावठाण जमिनीबाबत असलेल्या अडचणी सन जानेवारी २०१५ च्या नवीन कायद्याबाबत असलेल्या अडचणीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करता येईल. त्यास शासकीय दराप्रमाणे मंजुरी मिळाल्यास केंद्र सरकार अतिरिक्त निधी देईल, अशी माहितीही प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात अाली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...