आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरच्या वीज वितरण कंपनी कार्यालयाला नगरपालिकेने दिला जप्तीचा शाॅक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार- नवापूर वीज वितरण कंपनी कार्यालयाचे अधिकारी बारा वर्षापासून थकीत असलेली १६ लाख २० हजार घरपट्टी व नळपट्टी भरत नसल्याने अभियंते बी.एस.कोळे यांचा दालनाला नगर पालिका वसुली विभागाचे कर्मचारी यांनी कुलुप लाऊन सिल करुन अभियंता यांची खुर्ची जप्त केली आहे.नगरपालिकेने गुरूवार पासून घरपट्टी व नळपट्टी वसुली मोहीम धडाक्याने सुरु आहे.
 
या अनुषंगाने नवापुर वीज मंडळ कार्यालयाचे अभियंता बी एस.कोळे यांचा दालनाला नगर पालिका वसुली विभागाचे कर्मचारी यांनी कुलुप लाऊन सिल करुन अभियंता यांची खुर्ची ताब्यात घेतली आहे विज वितरण कडे १२ वर्षा पासुन घरपट्टी व पाणीपट्टी ही बाकी होती  १६ लाख २० हजार एवढी थक्कबाकी आहे.
 
नवापुर नगरपालिका वसुली विभागाने वीज वितरण कंपनीला वारंवार नोटीसा देऊन देखील त्यांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरली नाही त्यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यांना शेवटची नोटीस ३१ जानेवारी २०१७ रोजी देत त्यांना जप्ती नोटीस बजाविण्यात आली होती त्या दरम्यान कर भरण्याबाबत कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने मुख्यधिकारी सौ.प्रतिभा पाटील यांचा मार्गदर्शना खाली नगरपालिकेला असलेल्या अधिकारानुसार उपकार्यकारी अभियंता यांचा दालनातील खुर्ची जप्त केली असुन दालनास सिल करण्यात येऊन सदर बाब कराची रक्कम प्राप्त होई पर्यत अटकाऊन ठेवण्यात आलेली आहे.
 
सदर कारवाई प्रसंगी कार्यालयात महावितरण कंपनी श्रीमती पाडवी. अभियंता वाजे हजर होते सदरची कारवाही पार पाडण्यासाठी नगरपालिकेचे कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरेकर, निरीक्षक परशुराम ठाकरे वी.एन अहिरे अंनत पाटील, नथ्थु अहिरे, रमेश सोनार, मोहमद पठाण, रविद्र बागले, गिरीष सांगळे संतोष सोनार यांनी समक्ष हजर राहुन कार्यवाही पार पाडण्यात आली आहे.
 
पालिकेच्या भरणा लवकर करावा; अन्यथा जप्ती
पालिका हदीत ज्या नागरिकांकडून कराची रक्कम येणे असेल त्यांनी पालिका कार्यालयात येऊन घरपट्टी व नळपट्टी कराची रक्कम भरणा करावी अन्यथा त्यांचावर सुध्दा जप्तीची कारवाही करण्यात येईल. 
प्रतिभा पाटील, मुख्याधिकारी, नगर परिषद, नवापूर.
 
डिजिटल बोर्ड व्दारे वसुली चांगली 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ थक्कबाकीदांचे नाव व रक्कम सर्वाजनिक करून डिजिटल बोर्डावर लावण्यात आली आहे. काही नागरिकांचे नाव सार्वजनिक होत असल्याने आपल्या नावाची बदमानी होऊ नये म्हणून तात्काळ पालिकेचा भरणा करीत आहेत. डिजिटल बोर्ड व्दारे वसुली चांगली होत आहे. असे पालिका प्रशासनाचे अधिकारी म्हणत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...