आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर रेल्वेस्थानकावरील बंद दूरध्वनी अखेर सुरू, बीएसएनएलचे अभियंते विष्णू निफाडे यांनी घेतली दखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर- नवापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवापूर रेल्वे स्थानकावरील सुमारे एका वर्षापासून संपर्क क्रमांक बंद असल्याची बातमी दैनिक दिव्य मराठीनी गुरूवारी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत बीएसएनएल चे अभियंते विष्णू निफाडे यांनी रेल्वे स्थानकावर एक पथक पाठवून फोन सुरू केला आहे.वायरलेस फोन दिला आहे त्याचा वापर करण्यात यावा.यासाठी अधिकृत पत्र दिले नाही.त्यामुळे आम्ही नवीन नंबर जाहीर करून शकत नाही. असे सांगत रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्टर वेळ मारत होते.
 
यासंदर्भात बीएसएनएल चे अधिकाऱ्यांनी तात्काळ किरकोळ दुरूस्ती करून वायरलेस फोन वापरण्यास लेखी पत्र देऊन परवानगी दिली नवापूर रेल्वे स्थानकावरील जुना नंबर ०२५६९२५०२२२ हा बदला असून त्याऐवजी नवा सीडीएमए टेलिफोन नंबर ०२५६९२६१२२२ दिला आहे.
 
 दिव्य मराठीच्या बातमीने गेल्या एक वर्षांपासून न मिळणार पत्र मिळाले व गुजरात राज्यातील तापी व अहवा डांग जिल्हयातील तसेच नवापूर तालुक्यातील प्रवाश्यांचा कायमस्वरुपी समस्या दूर झाली. रेल्वे चे अधिकारी अविनाश कुमार म्हणतात की,रेल्वे स्थानकावर विचारपूस करण्यासाठी कक्षाची व्यवस्था नाही.त्यामुळे पब्लिक फोन स्टेशन मास्तर घेतात त्यावेळीच रेल्वेगाडी पास करण्यासाठी सेक्शन कंट्रोल फोन,रेल्वेगेटचे तीन फोन, पॅनेल व ब्लॉक नियंत्रण करणे रजिस्टर मध्ये नोंद करणे असे काम तात्काळ करावे लागतात.आता केवळ फोन स्टेशन मास्टर यांच्या टेबलावर उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे फोन घेणे सोपे जाईल.
 
नवापूरच्या नव्हे नंदुरबारच्या सदस्यांची कामगिरी 
दिव्य मराठीची बातमी वाचून नंदुरबार येथील पश्चिम रेल्वे बोर्डाचे सदस्य संजय शाह यांनी टेलिफोन सुरू करण्यासाठी धुळे येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क केला तसेच रेल्वे अधिकाऱ्यांनी चर्चा केली व काही सुचना दिल्या नवापूर शहरातील पश्चिम रेल्वे बोर्डाचे सदस्य शरद लोहार यांना शहरातील समस्येवर मात करता आले नाही परंतू नंदुरबार येथील सदस्यांनी उपाययोजना केली.
 
दिव्य मराठीचे आभार मानतो !
नवापूर शहरापासून रेल्वे स्थानक पाच किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेची माहित घेण्यासाठी स्टेशन लांब पडत असल्याने संपर्क क्रमांक हा एकमेव उपाय आहे. गेल्या वर्षभरापासून फोन बंद असल्याने दैनिक दिव्य मराठीच्या बातमी फोन सुरू झाल्याने दिव्य मराठीचे आभार मानतो ही सेवा कायमस्वरूपी सुरू राहावी. श्रीकांत पाठक, अध्यक्ष,रेल्वे प्रवाशी संघटना, नवापूर.
बातम्या आणखी आहेत...